मुरुड: अरुंद रस्त्याचा अंदाज न आल्याने कार पलटी; जीवितहानी टळली, चारही प्रवासी सुखरूप

By Raigad Times    13-Aug-2022
Total Views |
murud
मुरुड | मुरुड अलिबाग रस्त्यावर मोरे ते विहूर दरम्यान अरुंद रस्त्यामुळे MH04KW2201 क्रमांक असलेली कार पलटी झाली. सदर अपघात हा अरुंद रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे झाला असल्याचे समजते. या कारमधील चारही प्रवासी सुखरूप आहेत. सुदैवाने जीवितहानी टळली आहे. कारमधीस चौघेही मुंबई येथील आहेत.
 
 
मुंबई येथून मुरुड फिरायला आलेल्या कारला मुरुडहुन मुंबईकडे जात असताना विहुर पेट्रोल पंपाच्या पुढे अरुंद रस्त्याच्या अंदाज न आल्यामुळे कार पलटी झाली. या गाडीत चौघेजण प्रवास करीत होते. हे चारही प्रवासी सुखरूप असल्याचे समजते.
 
 
तरी हा रस्ता सुसज्ज करावा अशी मागणी वाहन चालकांनी आणि प्रवाशांनी केली आहे. सदरच्या अपघाताची माहिती मिळताच मुरुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघात ग्रस्तांना मदत केली.