भाजप प्रदेशाध्यक्षपदी बावनकुळे, मुंबई अध्यक्षपदी पुन्हा आशीष शेलार यांची नियुक्ती

13 Aug 2022 11:20:57
BJP
 
मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांना शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळात स्थान मिळाले. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष या दोन्ही पदांवर नव्याने नियुक्ता होणार हे निश्चित होते. त्यानुसार प्रदेशाध्यक्षपदी नागपूरचे चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई अध्यक्षपदी आमदार आशीष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीची घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नवी दिल्लीत केली.
 
 
मुंबई महानगरपालिका जिंकून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का देण्याचा निर्धार केलेल्या भाजपने शेलार यांच्याकडेच पुन्हा मुंबईची सूत्रे सोपविली आहेत. तर आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करण्याचे आव्हान बावनकुळे यांच्यासमोर असणार आहे.
Powered By Sangraha 9.0