श्रीवर्धन: जावेळे पुलाच्या दुरुस्तीसाठी शिवसेनेचे निवेदन; दोन वर्षे उलटूनही नागरी समस्येकडे दुर्लक्ष

By Raigad Times    13-Aug-2022
Total Views |
shivsena
 
श्रीवर्धन | श्रीवर्धन तालुक्यातील जावेळे येथील पुलाच्या दुरुस्तीसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात निवेदन सादर केले आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास शिवसेना आंदोलन करेल, असा इशारा तालुकाप्रमुख अविनाश कोळंबेकर यांनी दिला आहे.
 
जावेळे पूल गेल्या दोन वर्षांपासून नादुरुस्त आहे. परिणामी सदरच्या मार्गावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. पूल नादुरुस्त असल्याने वडशेत वावे, जावळे, धारवली, आडी या गावातील लोकांना वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
 
त्यामुळे प्रशासनाने लवकरच पुलाची दुरुस्ती करावी या मागणीसाठी शिवसेना पदाधिकारी अविनाश कोळंबेकर, नगरसेवक अंनत गुरव, शिवसेना युवा शहर अध्यक्ष शिवराज चाफेकर, कृष्णा रटाटे, राजू चव्हाण, अरुण शिगवण आणि इतर पदाधिकारी यांनी निवेदन दिले आहे.