एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये 80 जागांसाठी भरती

13 Aug 2022 13:47:22
LIC
 
मुंबई | नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये विविध जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.
 
सदर भरतीत असिस्टंट पदासाठी 50 आणि असिस्टंट मॅनेजर पदासाठी 30 अशा एकूण 80 जागांसाठी ही भरती असणार आहे.
 
शैक्षणिक पात्रता:
  • पद क्र.1: 55% गुणांसह पदवीधर
  • पद क्र.2: 60% गुणांसह पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी किंवा 50% गुणांसह पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी किंवा 03 वर्षे DME
वयोमर्यादा:
  • पद क्र.1: 21 ते 28 वर्षे
  • पद क्र.2: 21 ते 28 वर्षे आणि 21 ते 40 वर्षे
शुल्क: भरतीसाठी 800 रुपये शुल्क आकारण्यात आले आहे.
 
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
 
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2022
 
ऑनलाइन परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2022
 
भरची संदर्भात अधिक माहितीसाठी एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडच्या https://www.lichousing.com/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
Powered By Sangraha 9.0