अलिबाग: नवगाव येथे अडकलेली बोट सुखरूप बाहेर काढण्यात आले यश

By Raigad Times    12-Aug-2022
Total Views |
alibag
अलिबाग | अलिबाग येथील नवगाव समुद्राच्या खडकात फिलिपाइन्स देशातील बोट तांत्रिक बिघाड झाल्याने अडकली होती. त्या बोटीत पाच जण अडकले होते. भारतीय तटरक्षक दलाचे जवान आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बोटीतील पाच जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.

alibag
 
दरम्यान, बोटीतील लोकांना बाहेर काढल्यानंतर बोट बाहेर कढण्याचे प्रयत्न सुरु होते. तर आता शर्तीच्या प्रयत्नानंतर ती फिलिपाइन्स देशातील बोट ही सुखरुप समुद्रातून बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे.
 

alibag