माणगाव: कचरा व घाणीमुळे बिकट झालेली वाट झाली सुकर; स्वच्छता सभापतीनी घेतली दखल

By Raigad Times    12-Aug-2022
Total Views |
garbage
 
उतेखोल/माणगाव | केवळ इच्छा शक्तीच्या जोरावर माणगाव नगरपंचायतीचे कर्तव्यतत्पर स्वच्छता व आरोग्य सभापती अजित तार्लेकर यांनी सामाजिक स्वच्छता विषयक बातमीची दखल घेत, उतेखोल आश्रमशाळेजवळी लहानग्या आदिवासी विद्यार्थ्यांची कचरा आणि घाणीमुळे बिकट झालेली वाट सुकर केली आहे.
 
चुकीच्या पध्दतीत कचरा डंपिंग केल्याने, गेले अनेक दिवसांपासून येथे वाट बिकट झाली होती. अक्षरशहा येथील आदिवासी वाडीतून एखादी व्यक्ती आजारी पडली तर तिला या वाटेवरुन उपचारासाठी रुग्णालयात न्यायचे झाले तर पालखीतुनच न्यावे लागेल अशी अवस्था झाली आहे.
 
 
कोणतेही वाहन येथ जात नव्हते, अगदी साधी ऑटो रिक्षाही येथे येण्यास नकार देत. ही वाडी छोटी आहे, पण नगरपंचायत हद्दीत असताना अशा प्रकारे मुलभूत अधिकारांपासुन येथील ग्रामस्थ महिला, लहान विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे. केवळ दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी कुणाकडे न्याय मागावा? येथील स्थानिकांनी तशी माहितीवजा अर्ज देखील नगर पंचायतीस दिल्याचे आमचेशी बोलताना आपली व्यथा सांगितली. हे वृत्त आल्याने अखेर कर्तव्यदक्ष स्वच्छता सभापती तार्लेकर यांनी तातडीने दखल घेऊन ईच्छा शक्तीच्या जोरावर येथे जेसीबी यंत्रणा आणि सफाई कर्मचारी कामाला लावुन ही वाट मोकळी केली आहे. काही अंशी का होईना येथील आदिवासी वाडीतील जनतेच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
 
 
ही पुनरुद्भवी समस्या असून दैनंदिन लक्ष दिल्यास स्वच्छता आणि नियोजन केल्यास ती सुटेल. नगरपंचायतीच्या डंपिंग या विषयी अभ्यासपूर्ण नियोजनाद्वारेच कायम स्वरुपी उपाय योजना राबविणे आवश्यक झाले आहे. संबंधित घंटागाडी कंत्राटी सफाई कामगार येथील रस्त्याचे समस्यांबाबत नाराजी व्यक्त करतात, येथील रस्ता खराब आहे आणि वाटेत एक मोरी अर्धवट तुटली असून येथून घंटागाडी चालविताना कसरत करावी लागते, अपघाताची भिती व्यक्त करतात. संबंधितानी याची दखल घेऊन देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षात शहर स्वच्छतेच्या दृष्टीकोनातुन हे चांगले काम करणे आवश्यक आहे.