दहीहंडीची वर्गणी न दिल्याने तरुणांची दुकानदाराला मारहाण; दुकानाचीही केली तोडफोड

पुण्यातील धक्कादायक घटना

By Raigad Times    12-Aug-2022
Total Views |
crime
पुणे | कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्ष सर्व सण घरातल्या घरात मोजक्याच माणसात साजले केले गेले. मात्र, यंदा राज्यात कोरोनाचे संकट मागे टाकून पुन्हा जोषात सण साजरे करण्यात येणार आहेत. तसेच दहीहंडीच्या दिवशी राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याने अधिकच उत्साह आहे. पण पिंपरी चिंचवडमध्ये दहीहंडीच्या सणाला अधिच गालबोट लागल्याची घटना घडली आहे.
 
दहीहंडीसाठी 500 रुपये वर्गणी दिली नाही म्हणून मिठाई दुकानदाराला मारहाण केल्याची धक्कादायक प्रकार येथे घटला आहे. राहुल गुप्ता असे मारहाण झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. तसेच वाकड पोलीस ठाण्यात सदर प्रकाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
गुन्हा दाखल होताच वाकड पोलिसांनी प्रसाद राऊत, मनोज कदम, माऊली उपल्ले, यश रसाळ यांना अटक केली आहे. तर रोहित शिंदे, सुनील शेट्टी, विजय तलवारे याच्यासह 3 ते 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
 
नेमके घटले काय?
  • मिळालेल्या माहितीनुसार; राहटणीमधील राज स्वीट दुकानात तरुणांनी घोळका केला होता.
  • त्यांनी राहुल गुप्ता यांच्याकडे 500 रुपये वर्गणीची मागणी केली.
  • यावेळी गुप्ता यांनी 100 रुपये देतो असे सांगितले.
  • त्यानंतर तरुणांनी राहुल गुप्ता यांच्या कानाखाली मारली.
  • त्यानंतर 200 रूपये देण्याची तयारी दर्शवूनही या टोळक्यांनी राहुल आणि त्यांच्या भावाला मारहाण केली.
  • तसेच दुकानाची तोडफोड करत गल्ल्यातील 10 ते 12 हजार रुपये घेऊन तिथून निघून गेले.
दरम्यान, या प्रकारानंतर वर्गणी मागताना नागरिकांची इच्छा असेल तेवढीच वर्गणी स्वीकारावी अशी सूचना पोलिसांनी केली आहे. तसेच कुणी बळजबरी करत असेल तर त्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.