ठाकरेंना टक्कर देण्यासाठी शिंदे गट उभारणार मुंबईत नवे 'सेनाभवन'

By Raigad Times    12-Aug-2022
Total Views |
shinde vs thakarye
 
मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षाशी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेत फुट पडली. राज्यात सत्तापालट झाले, शिंदे-फडणवीस सरकार आले. त्यानंतर खरी शिवसेना कोणाची हा वाद सुरु झाला आणि तो वाद अजूनही कायम आहे.
 
तसेच हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला असू कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शिंदे-ठाकरे गटाला 15 दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. यात आता ठाकरे यांना टक्कर देण्यासाठी शिंदे गटानी मास्टर प्लान आखला असून आता मुंबईत नवे 'सेनाभवन' उभरणार आहे. यासंदर्भाची माहिती शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांनी दिली आहे.
 
एकनाथ शिंदे यांच्या कामाची गती पाहाता त्यांना एका चांगल्या कार्यालयाची गरज आहे आणि दादर परिसरातच शिंदे यांचे मुख्य कार्यालय असेल, अशी माहिती सदा सरवणकर यांनी दिली आहे.
 
मुंबईमध्ये ठाकरे कुटुंबाचे राज्य आहे, हे साफ चुकीचे आहे, हा आभास निर्माण केला जात आहे. मुंबईतल्या शिवसैनिकांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी आहे. मुंबई ठाकरेंचा गड बोलतात ते साफ चुकीचे आहे, असे सरवणकर यांनी म्हटले आहे.
 
याशिवाय नविन विभाग प्रमुख आणि शाखाप्रमुख यांचीही नियुक्ती केली जाणार आहे, त्यांच्याही स्वतंत्र शाखा असतील, या शाखांच्या माध्यमातून मुंबईतल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहितीही सरवणकर यांनी दिली.