महेंद्र थोरवेंच्या आमदार निधीतून माथेरानमधील विकास कामांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर

प्रशासक सुरेखा भणगेंचा पुढाकार

By Raigad Times    12-Aug-2022
Total Views |
matheran
माथेरान | कर्जत तालुक्यातील माथेरान हे सर्वांचे आवडते पर्यटनस्थळ असून या स्थळाकडे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांचे विशेष लक्ष असल्याने माथेरान मधील समस्त नागरिकांना सेवासुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नगरपरिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी 4 जुलै रोजी इथल्या महत्वपूर्ण विकास कामांसाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध व्हावा यासाठी महेंद्र थोरवे यांना निवेदन सादर केले होते. त्यानुसार ताबडतोब आमदार थोरवे यांनी आपल्या आमदार निधीतून हा निधी मंजूर करून नगरपरिषदेच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला असल्याचे सुरेखा भणगे यांनी सांगितले.
 
निधीतून अलार्म क्लॉक सिस्टीमसह बसविण्यासाठी 30 लाख रुपये, ई-रिक्षा खरेदी करणे, पीएमसीची नियुक्ती करणे आणि अनुषंगिक बाबींकरिता 20 लाख रुपये, माथेरान शहरात विविध ठिकाणी दिशादर्शक फलक बसविण्यासाठी 50 लाख रुपये,
माथेरान नगरपरिषदेच्या हद्दीतील शारलोट लेक येथील जहांगीर माणिकजी रोड लगत असणाऱ्या रस्त्यालगत विविध ठिकाणी गॅबियन वॉल बसविण्यासाठी 1 कोटी रुपये तर नगरपरिषदेच्या बीजे हॉस्पिटलच्या दुरुस्तीसाठी 3 कोटी रुपये असे एकूण 5 कोटी विकास कामांसाठी वापरले जाणार आहेत.
 
प्रशासक सुरेखा भणगे यांनी अल्पावधीतच इथली अनेक कामे मार्गी लावण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले असून आगामी काळात सुध्दा त्या नक्कीच या गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील राहतील असा विश्वास नागरिक व्यक्त करीत आहेत.