अलिबाग: पेंढाबे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी अॅड.रत्नाकर पाटील यांची निवड

12 Aug 2022 18:00:57
pendhabe
अलिबाग | खारेपाठ विभागातील ग्रुप ग्रामपंचायत पेंढाबेच्या उपसरपंच पदी पत्रकार, अॅड.रत्नाकर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. खारेपाठातील 35 वर्षे काँग्रेसच्या ताब्यात असलेली ग्रामपंचायत शेतकरी कामगार पक्षाने आपल्या ताब्यात घेऊन निर्विवाद वर्चस्व ठेवले आहे.
 
पेंढाबे ग्रामपंचायतच्या उपसरपंच स्मिता पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला होता. रिक्त उपसरपंच पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवार 12 ऑगस्ट रोजी निवडणूक घेण्यात आली.
 
अॅड.रत्नाकर पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सरपंच दिग्विजय पाटील यांनी उपसरपंच पदी अॅड.रत्नाकर पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर केली.
 
उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर अॅड.रत्नाकर पाटील यांनी सर्वांचे आभार मानताना आपण आज पर्यंत केलेल्या कामामुळेच हे पद मिळाले असून अधिक जबाबदारी वाढल्याचे सांगून शासनांच्या विविध योजना ग्रामपंचायत हद्दीत राबविण्याचा प्रयत्न सर्वांच्या सहकार्याने करू, असे सांगितले.
 
यावेळी ग्रामविकास अधिकारी शैलेश नाईक, सदस्य अविनाश आचरेकर, मंगल ठाकूर, ज्योती पाटील, नसीमा कुरेशी, कर्मचारी अजित पाटील, श्रुती बैकर, माजी सरपंच सचिन ठाकूर, नरेंद्र पाटील, सुधीर गोठणकर, लहू पाटील, आबास भाई, प्रवीण पाटील, कविता म्हात्रे, विजय सुर्वे, इसूब कुरेशी, प्रतिष पाटील, चिंतामण पाटील, जयेश बैकर, प्रसाद पाटील यश पाटील, सुजल पाटील उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0