बहिण भावाच्या नात्याचा गोड सण “रक्षाबंधन”

जाणून घ्या... मुहूर्त आणि राखी बांधण्याची योग्य पद्धत

By Raigad Times    10-Aug-2022
Total Views |
rakshabandhan
रायगड | श्रावण महिन्यातील पौर्णिमा ही राखी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. तसेच बहिण-भावाच्या नात्यामधील गोडवा जपण्यासाठी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. मागील दोन वर्ष सणांवर कोरोनाचे संकट होते. पण ते संकट कमी झाले असून, आता पूर्वी प्रमाणे रक्षाबंधन हा सण आनंदाने साजरा करता येणार आहे.
 
रक्षाबंधन 2022 मुहूर्त आणि तिथी वेळ
महाराष्ट्रात यंदा श्रावण पौर्णिमा 11 ऑगस्ट दिवशी 10 वाजून 40 मिनिटांनी सुरू होणार असून 12 ऑगस्ट दिवशी त्याची सांगता 7 वाजून 6 मिनिटांनी संपणार आहे. त्यामुळे या दिवसभरात तुम्ही राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करू शकाल.
 
राखी बांधण्याची योग्य पद्धत
  • राखीचे तबक तयार करताना त्यात हळद-कुंकु, दिवा, तांदुळ आणि राखी घ्या.
  • भावाला करंगळीच्या बाजुच्या बोटाने टिळा लावा. आणि त्याटिळ्यावर तांदळाच्या अक्षता लावा. याने सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
  • शक्य असल्यास सोन्याच्या किंवा चांदिच्या अंगठी किंवा नाण्याने भावाला ओवाळा.
  • ओवाळताना डावी कडुन उजवीकडे ओवाळा.
  • भावाच्या उजव्या मनगटावर राखी बांधा आणि गोड भरवा.
  • राखी देखील आता आकर्षणाचा भाग झाली आहे. त्यामुळे बाजारात ट्रेंड नुसार विविध आकारात, स्वरूपात राख्या उपलब्ध आहेत.
  • ऑनलाईन माध्यमातूनही राखीची खरेदी करता येऊ शकते त्यामध्येही भन्नाट प्रकार बघायला मिळतात.