धक्कादायक! उरणच्या समुद्रकिनारी सापडला तरुणाचा मृतदेह

08 Jul 2022 14:11:58
hitendra
 
उरण । उरण मधील पिरवाडी समुद्र किनारी दर्गाच्या पाठीमागे ७ जुलै रोजी एक मृतदेह आढळून आला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासाअंती पोलीस कर्मचाऱ्यांना आढळले की, सदर मृतदेह करंजा येथील हितेंद्र राजेंद्र म्हात्रे वय ३१ यांचे आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचे नाव हितेंद्र राजेंद्र म्हात्रे वय ३१ वर्षे, व्यवसाय- नोकरी, राहणार साईनगर, द्रोणागिरी हायस्कूलच्या बाजूला, करंजा, तालुका उरण, जिल्हा रायगड बांधा -मजबूत, उंची ६ फूट, रंग गोरा, नेसणीस -टी शर्ट, नेव्ही ब्लू रंगाची जीन्स आणि रेनकोट परिधान केलेला ६ जुलै सकाळी ११:३० वाजता घराबाहेर पडला तो घरी परतलाच नाही. या बाबत हितेंद्र म्हात्रे हरविल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात त्याच्या कुटुंबीयांनी केली होती.
 
उरण समुद्रकिनारी दर्गाच्या पाठीमागे मिळालेले मृतदेहचे रंग, रूप आदी सर्व माहिती उरण पोलीस ठाण्यात हरविलेल्या तक्रारीशी पूर्णपणे मिळती जुळती होती. त्यावरून सदर मृतदेह हितेंद्र म्हात्रे यांचेच असल्याचे पोलिसांनी खात्री केली.
 
मृत व्यक्ती हितेंद्र राजेंद्र म्हात्रे हे पोहण्यासाठी समुद्रात उतरले होते की त्यांनी आत्महत्त्या केली किंवा त्यांचा कोणी खून केला ह्याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या घटनेचा पुढील तपास उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
Powered By Sangraha 9.0