ऑनलाइन वॉशिंग मशीन खरेदी करणे पडले महागात

तब्बल ५४ हजार ९९७ रुपयांची झाली फसवणूक

By Raigad Times    04-Jul-2022
Total Views |
ONLINE
 
म्हसळा । ऑनलाइन वॉशिंग मशीन खरेदी करणाऱ्या समद कौचाली रा.तोराडी बंडवाडी या ग्राहकाने कस्टमर केअरच्या माध्यमांतून डीलेव्हरी ट्रॅक करताना कुरीअरचा शोध घेता घेता फोन केला असता कौचाली यांना तब्बल ५४ हजार ९९७ रुपयांचा गंडा बसल्याची घटना घडली आहे.
 
 
 
घटनेची नोंद समद कौचाली यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या सायबर सेल विभागाकडील बँक आर्थिक फसवणूक शाखेकडे ऑनलाइन पद्धतीने केली आहे. सदरची घटना तोराडी (ता.म्हसळा) येथे शुकवार १ जुलैला रात्री ११.४८ ते ११.५६ या सुमारास घडली. काही मिनिटांच्या फरकाने ४ एंट्री करून कौचाली यांचे आंबेत येथील स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या बचत खात्यातील रक्कमेवर सायबर गुन्हेगारानी डल्ला मारला.
 
 
कौचाली यांनी डीलेव्हरी कुरीअर चा मोबाईल क्र. ७८७२८९९१६८ यावर फोन लावला असता त्यांनी पुढील चौकशीसाठी मोबा क्रं ८८२६९५५१२२ कॉल केला असता त्यावर Contact Name LikelySpan असल्याचे कौचाली यांनी सांगितले. यानंबर वरून विशाल कुमार यांचा मोबा नंबर आणि लिंक देण्यात आली आणि आमचा घात झाल्याचे कौचाली यांनी सांगितले.
घडल्या प्रकाराची नोंद ऑनलाइन पध्दतीने करूनही तब्बल ४८ तास झाले तरी अद्याप कोणतीच कारवाई / तपास झाला नाही याची खंत वाटते ४ एंट्री होऊन कौचाली यांचे आंबेत येथील स्टेट बँक ऑफ इंडीयाचे बचत खात्यातील ५४ हजार ९९७ एवढी रक्कम ही एकाच खात्यांत Transfer ने गेली आसल्याचे समजते.
 
म्हसळा तालुक्यात आंबेत, सणदेरी, तोराडी, पांगळोली, मेंदडी, पाभरे या परिसरांतील गावांतून सायबर गुन्ह्यांतून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत पोलीस विभागाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृतीची आवश्यकता आहे.