अश्लील शिवीगाळ, ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

By Raigad Times    22-Jul-2022
Total Views |
arrest
 
माणगाव | अश्लील शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघा आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना मुंबई-गोवा महामार्गावर मच्छी मार्केट माणगाव येथे घडली. याबाबतची तक्रार रोहिणी उदय नांदे (वय-३७) रा.होडगाव कोंड ता.माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
 
 
सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, घटनेतील तक्रारदार रोहिणी नांदे व विरोधक महेंद्र शंकर मोरे, सुरेश नथुराम शिगवण दोघे रा.होडगाव कोंड ता.माणगाव हे एकाच गावातील रहिवासी आहेत. यांतील फिर्यादी व साक्षीदार सचिन चंद्रकांत गोळे (वय-४५), स्वाती राकेश कळमकर (वय-३०) दोन्ही रा.होडगाव कोंड ता.माणगाव हे मुंबई -गोवा महामार्ग रस्त्यावरून माणगाव कोर्टाकडे चालत जात असताना काळनदीच्या अगोदर मच्छी मार्केट येथे आरोपी यांनी फिर्यादी यांना अश्लील शिवीगाळी करून फिर्यादी यांचा हात पकडून फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळी करून ठार मारण्याची धमकी दिली.
 
 
या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गु.रजि.नं.२०९/२०२२ भादवि संहिता कलम ३५४,३५४ अ(१),५०९,५०४,५०६,३४ प्रमाणे करण्यात येऊन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील या करीत आहेत.