डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रायगड जिल्हा पोलीस कल्याण निधीस ७ लाखांचा धनादेश सुपूर्द

By Raigad Times    20-Jul-2022
Total Views |
nana dharmadhikari
 
 
अलिबाग | डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने बुधवार 20 जुलै रोजी रेवदंडा येथे रायगड जिल्हा पोलीस कल्याण निधी करीता पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉ. दत्तात्रेय नारायण तथा अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते तब्बल ७ लाखांचा धनादेश रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
 
यावेळी अपर पोलीस अधीक्षक रायगड अतुल झेंडे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड दयानंद गावडे, उमेशदादा धर्माधिकारी, डॉ. सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी हे उपस्थित होते.
 
"रायगड जिल्हा पोलीस कल्याण निधी करीता ७ लाख रुपयांचा धनादेश प्राप्त झाला असून, सदर रकमेचा विनीयोग रायगड जिल्हयातील पोलीस अधिकारी, अंमलदार आणि त्यांचे कुटुंबीयांच्या कल्याणासाठी केला जाईल. रायगड जिल्हा पोलीस दल आणि त्यांच्या कुटुंबीयांतर्फे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांचे मनःपूर्वक आभार."
-अशोक दुधे, पोलीस अधीक्षक, रायगड