राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत भरती जाहीर

By Raigad Times    20-Jul-2022
Total Views |
Nabard
 
 
रायगड | नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवरांनी या संधीचा लाभ घ्यावा.
 
पद आणि जागा
असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS) या पदासाठी 161 जागा, असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (राजभाषा) या पदासाठी 7 जागा आणि असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (P & SS) पदासाठी 2 जागा अशा एकूण 170 जागांसाठी भरती असणार आहे.
शैक्षणिक पात्रता
  • पद क्र.1: 60% गुणांसह संबंधित विषयात पदवी/BE/B.Tech/MBA/BBA/BMS/P.G.डिप्लोमा/CA (SC/ST/PWBD: 05% गुणांची सूट)
  • पद क्र.2: 60% गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (SC/ST/PWBD: 05% गुणांची सूट)
  • पद क्र.3: तो / ती वैध माजी सैनिक ओळखपत्र असलेल्या सैन्यात / नौदल / हवाई दलात कमीतकमी पाच वर्षांची कमिशनयुक्त सेवेची अधिकारी असावी.
वयोमर्यादा
 
  • पद क्र. 1 आणि 2: 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  • पद क्र.3: 25 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
शुल्क
  • पद क्र. 1 आणि 2: General/OBC साठी 800 रुपये आणि SC/ST/PWBD साठी 150 रुपये
  • पद क्र.3: General/OBC साठी 750 रुपये तर SC/ST साठी 100 रुपये
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 7 ऑगस्ट 2022
सदर भरती संदर्भात अधिक माहितीसाठी https://www.nabard.org या संकेत स्थळाला भेट द्या.