कर्जत | कर्जत शहरातील मुद्रे गावाजवळ नगरपालिकेने बसवलेले पेव्हर ब्लॉक व्यवस्थित न बसवल्यामुळे वाहन चालका आणि प्रवाशांना त्याचा त्रास होताना दिसून येत आहे.
मुद्रे गावाजवळ जाणाऱ्या रस्त्यावरील पेव्हर ब्लॉक निघून गेले आहेत. तसेच निकृष्ट दर्जाचे दिसून येत आहेत. नगरपालिकेच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तसेच नगरपालिकेतील नगरसेवक ठेकेदार बनले आहेत. मुद्रे गावाजवळ रस्त्यांची चाळण होताना दिसून येत आहे.
अनेक ठिकाणी नगरसेवक ठेकेदार काम करत असल्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम होताना दिसून येत आहे. त्यामुळे नगरपालिकेतला इंजिनियर विभाग काय करतो? असाच प्रश्न कर्जतकर विचारत आहेत. नगरपालिकेने कृपया लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी सर्वत होताना दिलत आहे.