तळा: तारणे येथे २२ वर्षीय मुलीचा विनयभंग

अज्ञात इसमास शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान

By Raigad Times    11-Jul-2022
Total Views |
molestation
तळा | तळा तालुक्यातील तारणे येथील बस स्टँडवर उभ्या असलेल्या २२ वर्षीय मुलीचा अज्ञात इसमाने विनयभंग केल्याची धक्कदायक घटना घडली आहे.
 
सदर घटनेबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, ९ जुलै २०२२ रोजी दुपारच्या सुमारास ही मुलगी बस स्टँडवर उभी असताना तळा बाजूकडून मोटारसायकल वर येणाऱ्या अज्ञात इसमाने त्या मुलीसमोरून दोन ते तीन वेळा फेऱ्या मारल्या आणि जवळपास कोणीही नाही याचा अंदाज घेऊन तिच्या जवळ जावून थांबला. हे पाहताच ती मुलगी घाबरुन पळून जात असताना त्या इसमाने पाठीमागून येऊन त्या मुलीची ओढणी ओढून वक्षस्थलावर हात टाकून लज्जा उत्पन्न होईल असे वाईट कृत्य करून विनयभंग केले. त्यानंतर त्या इसमाने तेथून पळ काढला.
 
सदर तक्रारीची नोंद १० जुलै रोजी गुन्हा रजिस्टर नं.६२/२०२३ भा.द.वि.क.३५४(अ)(२)करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक शिवराज खराडे सहकारी करीत असून अज्ञात इसमास शोधण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर उभे राहिले आहे. तसेच पीडित मुलीला न्याय मिळून दिला जावा आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करून जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे.