अमित ठाकरेंनी पेण पदाधिकारी कार्यकर्त्यांबरोबर साधला संवाद

रुपेश पाटील यांनी विठ्ठल रखुमाईची मुर्ती देऊन केले स्वागत

By Raigad Times    11-Jul-2022
Total Views |
 amit thakare
 
 
पेण | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांचे सुपुत्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे कोकण दौऱ्यावर असताना त्यांनी पेण येथील कासार आळी येथील महाकाली सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पेणचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला.
 
यावेळी तालुकाध्यक्ष रुपेश पाटील, शहराध्यक्ष सुरेश संसारे संदीप ठाकुर, महेश पोरे, नितीन पाटिल, प्रकाश मनोरे, श्रीराम म्हात्रे, हनुमान नाईक आदी तालुका आणि शहर पदाधिकाऱ्यांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अमित ठाकरे यांनी रायगड दौऱ्यावर असताना विद्यार्थी सेनेच्या बांधणीसाठी चर्चा करण्यात आली होती. पेण येथील कार्यक्रमा दरम्यान ही अमित ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांबरोबर या बाबत संवाद साधला.
पेण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष रूपेश पाटिल आणि महीला शहराध्यक्ष निकिता पाटिल यांनी अमित ठाकरे यांना आषाढी एकादशीचे औचित्य साधत विठ्ठल रखुमाईची मूर्ती भेट दिली. यावेळी तालुक्यातील सर्व मनसे पदाधिकार्यांनी भला मोठा पुष्प हार घालून अमित ठाकरे यांचे जंगी स्वागत केले.