श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव, रोहा मधील महसूल यंत्रणा होणार बळकट...

पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नांनी जनतेला मिळणार तत्पर सेवा..!

By Raigad Times    29-Jun-2022
Total Views |
aaditi tatkare
 
 
श्रीवर्धन । राज्याच्या आणि जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये महसूल विभाग हा प्रमुख विभाग असून त्यास प्रशासकीय यंत्रणेचा कणा म्हणून संबोधण्यात येते. राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सक्षम आणि बळकटीकरण करण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्याचाच एक महत्वपूर्ण टप्पा म्हणून महसूल यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि सिडकोमार्फत संपादित करण्यात आलेल्या आणि संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीसाठी देय असलेल्या भूसंपादन मोबदला रक्कमेच्या प्रमाणात कार्यालयीन सोयीसुविधा शुल्क आकारण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
 
 
रायगड जिल्ह्यातील दुर्गम व अविकसित तालुक्यात महसूल विभाग सक्षम करणे आवश्यक असल्याने आणि शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यत सहज आणि सुलभरित्या उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ग्रामस्तरीय, तलाठी आणि मंडळ अधिकारी यंत्रणा, तालुका आणि उपविभागीयस्तरीय तहसिलदार आणि उपविभागीय अधिकारी (प्रांत) यंत्रणा बळकट करण्याचे नियोजन हाती घेण्यात आले. त्यासाठी राज्य आणि जिल्हा स्तरावर सिडको, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, कोकण विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी रायगड आणि संबंधित उपविभागीय अधिकारी (प्रांत) यांच्या बैठका घेण्यात आल्या. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जिल्ह्यातील श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव आणि रोहा या तालुक्यातील एकूण ९० तलाठी आणि मंडळ अधिकारी कार्यालयाच्या इमारती बांधकामासाठी सुमारे रुपये ८०.०६ कोटी इतकी रक्कम उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे.
 
 
तसेच सिडकोमार्फत तहसिलदार कार्यालये, म्हसळा आणि पेण तसेच उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालये, रोहा आणि पेण यांच्या प्रशासकीय इमारती बांधकामासाठी तत्त्वत: मान्यता दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तलाठी, मंडल अधिकारी, तहसिलदार आणि उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालयाकरिता शासकीय जमीन प्रदान करण्यात आली आहे. सिडकोमार्फत तज्ञ वास्तूविशारद नियुक्त करून त्यांच्यामार्फत इमारतींच्या बांधकामाचे आराखडे तयार करण्यात येत आहेत व नजीकच्या कालावधीमध्ये या तहसिलदार आणि प्रांत कार्यालयांच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची प्रक्रिया लवकरच हाती घेण्यात येणार आहे.
 
 
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ही कार्यालये बांधण्यासाठी तज्ञ वास्तूविशारदामार्फत बांधकामाचे आराखडे तयार करून त्याची अंदाजपत्रके जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर केली. कोकण विभागीय आयुक्तांनी शासनाचे धोरण विचारात घेऊन श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव व रोहा या तालुक्यातील एकूण ९० तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयाच्या इमारती बांधकामासाठी सुमारे रुपये ८०.०६ कोटी इतकी रक्कमेस प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे व या कार्यालयांचे बांधकाम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत हाती घेण्यास सुद्धा मान्यता प्रदान केली आहे. त्यानुषंगाने महामंडळामार्फत बांधकामाची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच ही बांधकामे एक वर्षाच्या आत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
 
रायगड जिल्ह्याच्या प्राकृतिक रचनेनुसार समुद्र किनारपट्टी, डोंगराळ व दुर्गम भागात लोकवास्तव्य आहे. औद्योगिक जिल्हा म्हणून पसंतीस असलेल्या रायगड जिल्ह्यात केंद्र व राज्यशासन पुरस्कृत अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात आलेले आहेत. भूसंपादनापोटी देय शुल्काच्या प्रमाणात उपलब्ध निधीच्या सुयोग्य विनियोजनातून महसूल यंत्रणा बळकटीकरणासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री तटकरे यांच्या पुढाकारातून हाती घेण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच दिशादर्शक असून या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ होण्यासाठी निश्चितच मदत होईल, असा विश्वास वाटतो.
 
 
या उपक्रमामध्ये समाविष्ट असलेल्या तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे:
 

अ.क्र.

तालुका

तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयांची संख्या

तलाठी कार्यालये

तलाठी व मंडल अधिकारी कार्यालये

1

श्रीवर्धन

17

गालसुरे, मेघरे/भारडोली, रानवली, बोरले/नागलोली, दांडगोरी, निगडी, मारळ, जसवली, शिरवणे/चिखलफ, वावे तर्फे श्रीवर्धन, वेळस, बागमांडला, कोंडीवली/शेखाडी

बोर्ली पंचतन,

वाळवटी

2

म्हसळा

14

देवघर, वारळ, पाष्टी, वरवटणे, केलटे, आंबेत, पांगळोली, भापट, लिपणी, तेलवडे, पाभरे, खरसई

खामगांव

3

तळा

16

मेढे, माजगांव, काकडशेत, पिटसई, शेणवली, पढवण, निगुडशेत, बेलघर, उसरखुर्द, भानंग, महागाव, बोरघर हवेली

तळा, मांदाड

4

माणगांव

33

चांदोरे, नांदवी, उणेगाव, दहीवली तर्फ गोवेले/वडवली, तारमारी/शिरवली, होडगाव, जिते, तळेगांव, पन्हळघर बुद्रुक, पोटणेर, खरबाचीवाडी/करंबेळी, हरकोल, रातवड, चाच, बामणोली, कालवण, सुरव तर्फ तळे, पहेल, मलईकोंड/पुरार, रेपोली, साले, मुद्रे/ मांजरवणे, खरवली, नागांव, पळसगांव बुद्रुक, निजामपूर, कांदळगाव बुद्रुक, कोस्ते खुर्द

लोणेरे, मोर्बा, देगांव, तळाशेत, इंदापूर, निजामपूर,

5

रोहा

10

दुरटोली, धामणसई, खारगांव, चांदगाव, खांब, बेलघर, शेनवई, सारसोली, वाली, पुगांव

-