अलिबाग । एकनाथ शिंदे यांनी महाडचे आमदार भरत गोगावले यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती केली आहे. शिंदे यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीचे निशाण फडकवल्यानंतर त्यांच्यासोबत रायगडातील तिन्ही आमदार गेले आहेत. यात महाडचे आमदार भरत गोगावले यांचादेखील समावेश आहे. शिवसेनेच्या तिकिटावर तिनवेळा निवडूण आल्यानंतरही पक्षाकडून लक्ष दिले जात नसल्याचे त्यांना शल्य होते.
आमदार गोगावले यांना मंत्रीपदाची अपेक्षा होती मात्र ते मिळाले नाहीच; परंतू राष्ट्रवादीचा पालकमंत्री देण्यात आला. त्यांच्याकडून होणार्या अन्यायाची दाद मागितल्यानंतरही न्याय मिळाला नाही त्यामुळे ते नाराज होते.
दरम्यान, एकाबाजूला कोणताही वेगळा गट स्थापन करणार नाही असे म्हणार्या शिंदे यांनी गोगावले यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करुन शिवसेना नेतृत्वाला शह देण्याचा प्रयत्न केला आहे.