रग्बी फुटबॉलच्या जिल्हा निवड चाचणी शिबिराचे आयोजन

By Raigad Times    07-May-2022
Total Views |
Ragbi 
 
कर्जत | रायगड जिल्हा रग्बी फुटबॉल संघाची निवड करण्यासाठी चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नेरळ विद्या मंदिर मंडळाच्या शैक्षणिक संस्थेत आयोजित केलेल्या या शिबिरात जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयीन फुटबॉलपटू आणि रग्बी खेळाडू यांचा सहभाग होता.
 
नेरळ विद्या मंदिर येथील मैदानावर रायगड जिल्हा रग्बी असोसिएशन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने रग्बी फुटबॉल शिबिराचे आणि जिल्हा निवड चाचणी चे आयोजन करण्यात आले होते.
 
Organizing District Selection Test Camp for Rugby Football
 
या शिबिराचे उद्घाटन प्रसंगी विद्या मंदिर मंडळ कोषाध्यक्ष विवेक पोतदार यांचे हस्ते आणि प्राचार्य पी.बी. विचवे, रायगड जिल्हा रग्बी असोसिएशन सचिव केशव पवार, उपाध्यक्ष सागर शेळके, नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर, यांच्यासह क्रीडा शिक्षक आणि असोसिएशनचे पदाधिकारी जयवंत पारधी, नितीन सुपे, सौ. धनश्री कानडे उपस्थित होते.
 
Organizing District Selection Test Camp for Rugby Football
 
या शिबिरात ६० खेळाडूंचा सहभाग होता.खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय प्रशिक्षक आले होते.हे शिबिर जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आले होते