नोकरीची सुवर्णसंधी! “डाक सेवक” पदासाठी 5 जूनपर्यंत अर्ज करा

By Raigad Times    07-May-2022
Total Views |
gramin dak sevak 
 
नवी मुंबई : भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील 67 रिक्त पदे भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांकडून 5 जून 2022 पर्यंत व त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. त्याकरीता जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज https://indiapostgdsonline.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन भरावेत.
 
अर्ज भरण्याची शेवटची तारीख दि.05 जून 2022 असून इतर कोणत्याही माध्यमाद्वारे आलेले अर्ज व व्यक्तिश: (By hand) आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. सदर अर्जासाठीची फी प्रधान डाकघर, पनवेल 410206 येथे जमा करू शकतात.
 
पोस्ट विभाग उमेदवारांना कोणताही फोन कॉल करत नाही. संबंधित प्राधिकरणाद्वारेच सदर उमेदवारांशी पत्रव्यवहार जर असेल तरच केला जातो. उमेदवारांनी त्यांची वैयक्तिक माहिती /नोंदणी क्रमांक/ मोबाईल क्रमांक/ईमेल आयडी इतरांसमोर उघड करू नयेत आणि कोणत्याही अनैतिक फोन कॉल्सपासून सावध राहावे असा सल्ला दिला जातो.
 
अधिक माहितीसाठी https://indiapostgdsonline.gov.in/ या संकेस्थळास भेट द्यावी नियम व अटीवरील संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी अर्ज करावेत, असे आवाहन वरिष्ठ अधीक्षक डाकघर नवी मुंबई विभाग, वाशी, नवी मुंबई यांनी केले आहे.