खाजगी जागेत सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेला रस्ता हटविण्यासाठी उपोषण....

07 May 2022 11:13:56
uposhan
 
कर्जत | कर्जत तालुक्यातील वांजळे गावातील गावठाण लगत खासगी रस्ता बनविण्यात आले आहे. हा रस्ता हटविण्यात यावा या मागणीसाठी तेथील महिला कर्जत प्रांत कार्यालयाबाहेर उपोषणाला बसल्या आहेत.
 
प्रांत कार्यालयासमोर उपोषणाला बसलेली महिला
 
कर्जत तालुक्यातील वांजळे खरेदीखत गावठाण जागेत मीरा कमलेश ठाकरे यांची जागा आहे. या जागेत २०१३/१४ मध्ये विशेष घटक या फंडातून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता तयार केला.
 
प्रांत कार्यालयासमोर उपोषणाला बसलेली महिला
 
ठाकरे यांची हि खरेदी केलेली जागा असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता कसा काय केला असा सवाल पंचायत समितीकडे ठाकरे यांनी पत्र व्यवहार करून केला.
 
प्रांत कार्यालयासमोर उपोषणाला बसलेली महिला
 
याबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार केला,आंदोलन केले मात्र तरीही हा खाजगी जागेतील रस्ता तेथून हटवित नसल्याने अखेर मीरा ठाकरे या महिलेने या विरोधात आज पर्यंत दोन वेळा उपोषण केले. मात्र मागणी मान्य होत नसल्याने आता तिसर्‍यादा बुधवार पासून प्रांत कार्यालयाच्या समोर मीरा ठाकरे यांनी उपोषण सूर केले आहे .
 
कर्जत तालुक्याचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी याबाबत कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना पत्र पाठवून या प्रकरणी सखोल चौकशी करून त्या जागेतील रस्ता मोकळा करून देण्याबाबतची तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
 
तहसीलदार विक्रम देशमुख आणि नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी उपोषण कर्त्याना भेट घेतली आणि उपोषण सोडण्याची विनंती केली होती, मात्र न्याय मिळत नसल्याने दुसर्‍या दिवशी देखील उपोषण सुरू आहे.
 
आतापर्यंत वर्षभरात चारवेळा या महिला उपोषणाला बसल्या आहेत. दरवेळेस फक्त आश्वासन देऊन उपोषण सोडण्यास भाग पाडले. मात्र त्यावर अद्यापपर्यंत निकाल न लावल्याने पुन्हा उपोषणाला बसावे लागले आहे. आणि कर्जतचे लोकप्रतनिधींना सोयर सुतक आहे अशा भावना उपोषणकर्त्या मीरा ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.
 
संबंधित उपोषणाबाबत तहसीलदार विक्रम देशमुख हे स्वतः पंचायत समितीचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना घेऊन रस्त्याची सर्व्हे करणार असल्याची माहिती प्रांत कार्यालयाचे नायब तहसीलदार पुरुषोत्तम थोरात यांनी उपोषणकर्ते यांना सांगितले आहे.
Powered By Sangraha 9.0