संजय गांधी निराधार अनुदान योजनेत ३२ प्रस्तावांना मंजुरी

By Raigad Times    14-May-2022
Total Views |
Sanction of 32 proposals in Sanjay Gandhi Niradhar grant scheme
 
कर्जत | कर्जत तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सभेत ३२ लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले. कर्जत तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सभेचे आयोजन तहसील कार्यालयात करण्यात आले होते.
 
मनोहर थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला सदस्य भाई गायकर, शिवराम बदे, विजय मांडे, ऋषीकेश भगत, अमर साळोखे, कांता पादिर, पूजा सुर्वे, गट विकास अधिकारी छत्रसिंग रजपूत, नगरपरिषदेचे लेखापाल जितेंद्र गोसावी, नायब तहसीलदार विजय चव्हाण, अव्वल कारकून गोवर्धन माने आदी उपस्थित होते.
 
तहसीलदार देशमुख यांनी सदस्यांना या योजनेबद्दलची माहिती सांगितली. समितीकडे मंजुरी साठी आलेल्या आणि आवश्यक कागदपत्रे जोडलेली असल्याने सर्व ३२ अर्जाना मंजुरी देण्यात आली.
 
२०२२ मार्च अखेर पर्यंत संजय गांधी निराधार योजना अंतर्गत सर्वसाधारण १०४६ व्यक्तींना, अनुसूचित जातीच्या २५५ व्यक्तींना, अनुसूचित जमातीच्या २५१ व्यक्तींना, श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेंतर्गत १७१ सर्वसाधारण व्यक्तींना, ३८ अनुसूचित जातींच्या व्यक्तींना, ३७ अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेंतर्गत ७७७ व्यक्तींना,इ.
 
तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेंतर्गत १८९ व्यक्तींना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेंतर्गत २९ व्यक्तींना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय कुटुंब लाभ निवृत्ती वेतन योजनेंतर्गत ४१ व्यक्तींना अशा एकूण २८३४ व्यक्तींना दरमहा लाभ मिळत असल्याची माहिती तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली.