आईसह मुलगी बेपत्ता

By Raigad Times    14-May-2022
Total Views |
बेपत्ता दिपा व श्रावणी
 
पनवेल | राहत्या घरातून कपडे शिलाई करण्यासाठी बाहेर जातो असे सांगून आई व मुलगी घराबाहेर पडली. ते अद्याप घरी न परतल्याने त्या दोघी हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
 
भिंगारी गाव येथील येथे राहणार्या सौ.दिपा शशिकिरण कांबळे वय (२९) व त्यांची मुलगी कु.श्रावणी वय (११) या दोघी घराबाहेर पडल्या त्या अद्याप घरी परतल्या नाही आहेत. दिपा कांबळे या रंगाने सावळ्या, उंची ५ फुट ४ इंच, डोक्यावरील केस काळे, चेहरा उभट, नाक सरळ, उजव्या हातावर ओमचे चिन्ह गोंदलेले, तिला मराठी, हिंदी व कन्नड भाषा अवगत आहे.
 
तिच्या पायात चप्पल असून अंगात ड्रेस घातला आहे. तर मुलगी कु.श्रावणी हिचा चेहरा गोल, डोक्याचे केस वाढलेले, हनुवटीवर तिळ, उंची ४ फूट तिला मराठी व हिंदी भाषा बोलता येते. तसेच अंगावर फ्रॉक घातला आहे. या दोघींबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी २७४५२३३३ किंवा पो.हवा.एस.एम.फाळके यांच्याशी संपर्क साधावा.