डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत भव्य रक्तदान शिबिर संपन्न ; ७१९ दास्य भक्तांनी केले रक्तदान...

By Raigad Times    14-May-2022
Total Views |
organised blood donation camp
 
उरण | पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असणारे आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत जेएनपीटी वसाहत मधील मल्टिपर्पज सभागृहा मध्ये गुरुवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये ७१९ दास्य भक्त रक्त दात्यानी आपले मोलाचे रक्तदान केले आहे.
 
blood donation
 
या शिबिरामध्ये तीन रक्त पेढ्या नी आपली टीम तैनात केली आहे.जेजे महानगर ब्लड बँक ,जिल्हा रुग्णालयात अलिबाग रक्त केंद्र ,डी वाय पाटील रक्त पेढी यांचे सहकार्य मिळाले .
 
blood donation
 
डॉ नानासाहेब प्रतिष्ठाण मार्फत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उदघाटन जेएनपीटीचे मुख्य प्रबंधक जयवंत ढवळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी, जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर , ब्ल्यू स्टार सिक्युरिटी चे संचालक विकास भोईर, पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, जेएनपीटीच्या अधिकारी मनीषा जाधव ,इ.
 
blood donation
 
तसेच डॉ राज हिंगोराणी , जेजे महानगर ब्लड बँक पीआरओ अजय , डी वाय पाटील ब्लड बँकेचे, प्रसाद कुलकर्णी , हेगडे मॅडम, जिल्हा रुग्णालयात अलिबाग रक्त केंद्रचे डॉ श्रेयस पाटील, श्री सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
 
आज सर्वत्र रक्ताची गरज भासत आहे अनेकांनी रक्त न मिळाल्याने आपले प्राण गमावले आहे.त्यामुळे भासत असलेली रक्ताची गरज दूर करण्यासाठी पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्ताने डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या मार्फत रक्तदान शिबिर संपन्न झाले.
 
या आगोदर ही डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत भव्य रक्तदान शिबिर आरोग्य शिबीर,स्वच्छता मोहीम वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन मोहीम राबविण्यात आली आहे.शिबिरामध्ये रक्तदान करण्यासाठी दास्य भक्तांनी सकाळ पासूनच शिस्त बद्ध पद्धतीने आपला सहभाग घेतला होता.