रोहा | सर्वच बाबतीत वाढणारी महागाई थांबण्याचे नावच घ्यायला तयार नाही. त्यातच दैनंदिन जिवनात स्वयंपाकासाठी लागणा-या गॅस सिलेंडरचेही दर मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याने गॅसचे जेवण परवडत नसल्याने गृहीणी वर्गाने आपला मोर्चा सुक्या काटक्या व लाकडे याकडे वळविला असल्याचे दिसून येत आहे.
जंगल संपत्तीचा दिवसेंदिवस -हास होत असतानाच सरपण साठी लाकडे गोळा करताना जंगलात फार दूरवर जावे लागत असल्याने मध्यंतरी गृहीणी वर्गाने स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडरलाच पसंती दिली. त्यातच चुलीवर स्वयंपाक करणे थोडे त्रासदायक असल्याने गॅसवरील जेवण गृहींनीना परवडू लागले.
परंतू सद्यस्थितीत गॅसचे दिवसेंदिवस दिवस वाढते दर पाहता गृहीणींनी आपला मोर्चा आता सुक्या काटक्या व लाकडे यावर वळविला असल्याचे एकंदरीत परिस्थितीवरून दिसून येत आहे.
सुक्या लाकडांना पसंती मिळाल्याने डोंगर भागात राहणारे आदिवासी बांधव व अन्य जमातीतील महिला व पुरूष वर्गाला ही चांगला रोजगार मिळाला आहे.