हॉलिडे एन्जॉयसाठी बाहेर पडलेल्या चाकरमानी, पर्यटकांना वाहतूक कोंडीचा फटका.....

मुंबई गोवा महामार्गावर वाकण, वडखळ, पेण, माणगाव, नजीक चार ते पाच किमी च्या लांबच लांब रांगा, वाहतूक कोंडी पिछा सोड़ेना

By Raigad Times    14-May-2022
Total Views |
,मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी तासनतास वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशी , वाहनचालक त्रस्त झाल्याचे दिसून आले
 
सुधागड-पाली | उन्हाळ्याच्या दिवसात सागर किनारे व पर्यटन स्थले बहरली आहेत. मौजमस्ती व फिरन्यासाठी पर्यटक , नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागलेत. अशातच शुक्रवार, शनिवार रविवार व सोमवार सलग सुट्ट्या मिळाल्या आहेत. त्यामुळे मुंबई , पुणे व इतर शहर उपनगरातून सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आलेल्या पर्यटक, चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला.
 
,मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी तासनतास वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशी , वाहनचालक त्रस्त झाल्याचे दिसून आले
 
शुक्रवारी व शनिवारी सकाळपासून दुपारपर्यंत पेण वडखळ, वाकण, माणगाव याठिकाणी तासनतास वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. तीन ते चार किमी वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशी त्रस्त झाले . शिवाय रुग्णवाहिका देखील वाहतूक कोंडीत सापडल्याने रुग्णांचे हाल झाल्याचे दिसून आले.
 
,मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी तासनतास वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशी , वाहनचालक त्रस्त झाल्याचे दिसून आले
 
उन्हाचा तडाखा त्यात धुळीचे साम्राज्य यामुळे प्रवाशी बेजार झाल्याचे दिसून आले. महामार्ग चौपदरी करणाचा एक टप्पा पूर्ण झाला असला तरी वाहतूक कोंडी पिच्छा सोडत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
 
,मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी तासनतास वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशी , वाहनचालक त्रस्त झाल्याचे दिसून आले
 
सध्या चाकरमानी, कोकणवासीय यांची गावी येजा सुरू आहे. त्याचबरोबर पर्यटक देखिल जिल्ह्यातील तसेच तळ कोकणातील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी कोकणाकडे मोठ्या प्रमाणात निघाले आहेत. खाजगी वाहनांची वर्दळ वाढलेली आहे, शिवाय कोकणाकडे जाणार्या एसटी बसेस फुल्ल जात आहेत.
 
त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच वाहनांची संख्या वाढल्याने मोक्याच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे गाड्यांना निश्चित स्थळी पोहचण्यास उशीर झाल्याने प्रवाश्यांचा खोळंबा होत आहे. अवेळी येणार्या बसेस यामुळे प्रवाशी वर्गाचे प्रचंड हाल होत आहेत.
 
अशातच खाजगी वाहनचालकांकडून मात्र प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा उठवत दुपटीने भाडे वसूल करुन अक्षरशः लयलूट सुरु असल्याचे देखील पहावयांस मिळते. दामदुप्पट भाडे वसूल करण्यावर खाजगी वाहनचालकांनी भर दिला आहे. सिनजी गॅस ची वाहने असतानादेखील परवडत्त नाही ची रट लावून प्रवाशांची पिळवणूक केली जात आहे.
 
बसायचे असेल तर बसा नाहीतर जा अशी असभ्य व उर्मठ भाषा देखील काही वाहनचालक वापरू लागले आहेत. त्यामुळे अशा वाहनचालकांवर कारवाई व्हावी अशी मागणी प्रवाशी वर्गातून जोर धरू लागली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी खूप वाढली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग व पाली खोपोली राज्य महामार्गाचे काम सुरू आहे.
 
पनवेल ते पेण रस्ता चकाचक झाल्याने येथील वर्दळ वाढली आहे. अलिबाग, मुरुड, जंजिरा, नागाव, श्रीवर्धन, हरिहरेश्वर , आदी ठिकाणी जगभरातील पर्यटक सागरी किनार्‍यावर मौजमस्ती साठी येत असतात, सध्या सुट्ट्या असल्याने पर्यटन स्थळे हाऊसफुल झाली आहेत, शिवाय मुख्य महामार्ग देखील कोंडीत सापडले आहेत.
 
पाली, माणगाव, इंदापूर, कोलाड, पेण व वडखळ बायपास आदी ठिकाणी वाहतूक कोंडी असते. तर काही वेळेस वाहतूक धिम्या गतीने सुरु असते. त्यातच मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू असल्याने तर वाहतुकीवर आणखीणच परिणाम होतो. सुट्यांसाठी अनेकांनी एसटी बसेसच्या बहुतांश जागांचे आधीच आरक्षण केलेले असते.
 
त्यामुळे या बसेस खचाखच भरुन जात आहेत. एसटी बसेस ग्रामीण भागातील थांब्याजवळ न थांबता वडखळ बायपास उड्डाण पुलावरून जात आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांची मोठी अडचण होत आहे. शिवशाही व निम आराम बसमध्ये उभे प्रवाशी (स्टँडिंग शीट) घेत नाहीत. त्यामुळे प्रवाश्यांना तासंतास गाड्यांची वाट बघत थांबावे लागत आहे.
 
वेळेत आणि आरामदायी प्रवास करण्यासाठी अनेक जण खाजगी प्रवासी वाहनांना पसंती देवून अधिकची रक्कम खर्च करुन खाजगी वाहने भाड्याने घेवून गावाकडे निघाल्याचे दिसून आले. याचा सर्वाधिक फायदा खाजगी प्रवासी वाहतुकदारांना होत आहे. ज्या लोकांना खाजगी वाहतुक परवडण्याजोगी नाही व ज्यांना जवळपासच्या ठिकाणी जायचे आहे.
 
त्या लोकांना मात्र एस.टी.ची वाट पहावी लागते. कारण लांब पल्याच्या गाड्या त्यांना घेत नाहित व मधल्या थांब्यावर देखील थांबत नाही. तसेच बसेस गच्च भरुन गेल्याने अनेकांना उभे राहुनच प्रवास करावा लागतो. बहुतांश प्रवाश्यांना मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागतो.
 
परिणामी वृद्ध, महिला आणि लहाग्यांचे मोठे हाल होत आहेत. अरुंद रस्ता, रस्त्यावरील हातगाडी व फेरीवाले, दुतर्फा उभी केलेली वाहने आणि वाहनांची जास्त संख्या यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाकण नाका, पाली बाजारपेठ, माणगाव शहरात देखिल वाहतुक कोंडी होत आहे.
 
माणगाव गावातून मुंबई गोवा महामार्ग जातो येथे शहरातून डिव्हायडर टाकून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू ठेवली आहे. त्यामुळे येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक धीम्या गतीने सुरू असते. प्रवाश्यांना वाहतुक कोंडीमध्ये अडकुन बसावे लागत आहे.
 
पादचार्यांचे सुद्धा हाल होतात. वाहतुक पोलीस वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न करतात परंतू वाहतुकीवर ताण आल्याने वाहतुक कोंडी सोडविणे जिकरीचे होऊन बसते.
 
| वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन |
 
बेशिस्त वाहनचालक, अवजड वाहने, लेन सोडून पुढे जाणारी वाहने तसेच महामार्गाचे सुरु असलेले काम यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी होत आहे. वाहतुक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वाहतूक पोलीस महामार्गावर ठिकठिकाणी तैनात आहेत.
 
तसेच नाक्यांवर पोलीस चौक्या उभारल्या आहेत. परंतू महामार्गावरील वाहतुकीचा भार बघता पोलीसांवर वाहतुक कोंडी सोडवितांना ताण येत आहे.