चिरनेर गावापर्यंत NMMT बस सेवा सुरू करण्याचे भारतीय जनता पार्टीची मागणी.

14 May 2022 13:10:12
Bharatiya Janata Party demands to start NMMT bus service to Chirner village.
 
उरण | नवी मुंबई, मुंबईला जाण्यासाठी उरण मधील प्रवाशी नवी मुंबई परिवहन सेवा  (NMMT) च्या बसेसने खूप मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. मुंबई, नवी मुंबई मधून अनेक प्रवाशी NMMT च्या बसने उरण मध्ये येतात. जुईनगर येथून असलेल्या बसेस कोप्रोली पर्यंत येत असतात. मात्र कोप्रोली गावाच्या पुढे असलेल्या गावांना NMMT च्या बससेवेचा फायदा मिळत नाही.
 
NMMT bus service
 
त्या अनुषंगाने जुईनगर ते चिरनेर अशी बससेवा सुरु करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी मार्फत NMMT प्रशासनाकडे करण्यात आली आहे. सततच्या वाढत्या इंधन दर वाढीमुळे तसेच सीएनजी वाढीमुळे भविष्यात इलेक्ट्रिक बस चे प्रमाण वाढणार असून त्याचाफायदा प्रदूषण मुक्तीसाठी तर होणारच आहे.
 
त्याच बरोबर नागरिकांचे प्रवास सुखकर होऊन त्यांच्या पैशांची बचत देखील होईल. अशीच बस सेवा जुईनगर ते चिरनेर येथे सुरू करण्यासाठी दिनांक ११ मे २०२२ रोजी भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते अरुण पाटील, सामाजिक कार्यकर्ते वसंत भोईर ,संतोष गायकवाड यांनी  NMMT चे प्रशासकीय अधिकारी यांची भेट घेऊन जुईनगर ते चिरनेर गावापर्यंत बस सेवा चालू करण्यासाठी पत्रव्यवहार करून मागणी केली आहे.
 
लवकरच बस सेवा चिरनेर गावापर्यंत चालू करण्याचे आश्वासन अधिकार्यांकडून देण्यात आले आहे.या इलेक्ट्रिक वातानुकूलित  NMMT चा फायदा गावातील वयोवृद्ध, दिव्यांग, नोकरदार वर्ग, विद्यार्थी सर्वांना होणार आहे.
Powered By Sangraha 9.0