माथेरान शटल सेवेसाठी लवकरच अतिरिक्त प्रवासी डब्बे...

माथेरानकरांची मागणी मध्य रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडून मान्य... मध्य रेल्वे सकारात्मक

By Raigad Times    14-May-2022
Total Views |
matheran mini train
 
कर्जत | माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी सध्या पर्यटन हंगाम सुरु असून देशभरातील पर्यटक  उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी येत असतात. सध्या माथेरान च्या थंड हवेचा आस्वाद घेण्यासाठी येणारे पर्यटक यांच्यासाठी माथेरान ते दस्तुरी नाका यात मिनीट्रेन मधून प्रवास करण्याची इच्छा असते.

Additional passenger coaches for Matheran shuttle service soon ...
 
त्यासाठी मिनीट्रेन च्य शटल सेवेच्या गाड्यांना अतिरिक्त प्रवासी डब्बे जोडण्याची मागणी करणारे निवेदन माथेरानकरांनी केले. दरम्यान, मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Additional passenger coaches for Matheran shuttle service soon ...
 
माथेरानचा पर्यटन हंगामास सुरवात झाली असून पर्यटकांच्या संखे मध्ये वाढ होत आहे. माथेरानचे पर्यटन हे मिनी ट्रेन वर अवलंबून असते बर्‍याच पर्यटकांना डब्ब्यांची संख्या कमी असल्यामुळे शटल सेवेचा लाभ घेता येत नाही.
 
त्याकरिता शटल सेवा ही आठ डब्यांची करण्यात यावी तसेच शनिवार रविवार प्रमाणे सोमवार ते शुक्रवार शटल सेवेच्या कमीतकमी दहा अप आणि दहा डाऊन अशा सेवा तात्काळ चालू करण्याचे आदेश संबधीत विभागाला देण्यात यावेत जेणेकरून येणार्‍या पर्यटकांची सोय होऊन रेल्वेच्या उत्पन्नात देखील भर होणार आहे.
 
नेरळ माथेरान सिमेंट चे स्लीपर टाकण्याचे युद्ध पातळीवर काम चालू असल्याचे तसेच ऑप्टिकल केबल चेही काम अंतिम टप्यात असून ऑनलाइन बुकींग सुरू करण्यात येईल असे सांगितले तसेच येणार्‍या काळात नेरळ माथेरान सेवा अखंडित पणे जास्तीत जास्त फेर्‍या सुरू करण्याचे आणि प्रवाश्यांना चांगल्या सुख सुविधा देण्याचा प्रयत्न असणार आहे.
 
तसेच राज्य सरकार आणि नगरपरिषद यांच्या सहकार्याने रेल महोत्सव, कार्यक्रम आयोजित करण्याचा आणि विविध उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला.
 
माथेरानचे माजी नगराध्यक्ष अजय सावंत,विवेक चौधरी तसेच माजी नगरसेवक प्रसाद सावंत, कुलदीप जाधव यांनी मध्य रेल्वेचे मुंबई विबीभागीय व्यवस्थापक शलभ गोएल यांची त्यांच्या मुंबई येथील कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी माजी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांचे निवेदन मध्य रेल्वे व्यवस्थापकी गोयल यांना देण्यात आले.
 
त्या मिनीट्रेन च्या शटल सेवेच्या गाड्यांना अतिरिक्त प्रवासी डब्बे जोडण्याबाबत निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद दिला. महाव्यवस्थापक गोयल यांनी सम्बधित विभागाला आदेश देऊन पहिल्या टप्यात सोमवार १६ मे ते २० मे दरम्यान शनिवार रविवार प्रमाणे दहा फेर्‍या सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत.
 
तसेच लवकरच मॅकेनिकल विभागाकडून आठ डब्यांची चाचणी घेऊन त्याचीही पूर्तता करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासित केले आहे. शलभ गोएल यांचे मिनी ट्रेन साठी कायम सकारात्मक भूमिका राहिली असून यावेळी ,मध्य रेल्वे व्यवस्थापक यांचे प्रोटोकॉल इन्स्पेक्टर अजित म्हसाळकर देखील उपस्थित होते.
 
दरम्यान, जागतिक वारसा लागलेल्या नेरळ माथेरान मिनी ट्रेन चे सर्व प्रश्न मार्गी लागतील अशा आशावाद मध्ये रैवळायचे मुंबई विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांच्या या भूमिकेमुळे मिनीट्रेन नेरळ-माथेरान-नेरळ अशी मिनीट्रेन ची थेट प्रवासी सेवा देखील लवकरच सुरु होणार आहे असा आशावाद निर्माण झाला आहे