माणगाव | डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा २४ वा पदवीदान दीक्षांत समारंभ दिनांक ११ मे, २०२२ रोजी विद्यापीठाच्या प्रांगणात संपन झाला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी , मा. उदय सामंत, रायगडच्या पालकमंत्री कु. अदिती तटकरे यांना निमंत्रित करण्यात आले होते.
परंतु राज्यपाल व मंत्री महोदय कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी विश्वनाथ काळे यांनी पदवीदान कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या प्रसंगी विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक कामाचा त्यांनी आढावा घेवून उल्लेख केला.
या पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रदान प्रा. डॉ. अनिल सहस्त्रबुध्ये, अध्यक्ष, अखिल भारतीय शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
त्यांनीं छत्रपती शिवराय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भूमीत असलेल्या या राज्याच्या तांत्रिक विद्यापीठाचे नाव जागतिक पातळीवर घेवून जाण्याचे काम विद्यार्थी व प्राध्यापकांनी करावे. याकरिता लागणारे सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या कार्यक्रमाला डॉ. विकास रस्तोगी, प्रधान सचिव यांची उपस्थिती लाभदायक होती. त्यांनी विद्यापीठाच्या विविध कामाचा आढावा घेतला. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री. भगतसिंह कोशारी यांनी ऑनलाईन पदवीदान समारंभाला शुभेच्छा दिल्या.
उदय सामंत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व रायगडच्या पालक मंत्री कू. अदिती तटकरे यांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. भगवान जोगी यांनी कार्यक्रमाची पूर्णतः जबाबदारी सांभाळली.
तसेच डॉ. विवेक श्रीधर साठे यांनी परीक्षा नियंत्रक म्हणून पदवीदान समारंभाची जबाबदारी पार पाडली. या प्रसंगी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सभासद श्रीनिवास बेंडखले, डॉ. विवेक वडके, डॉ. वाडेकर, डॉ. बर्बिज तसेच कार्यकारी परिषदेचे सभासद व विद्यां परिषदेचे सभासद उपस्थित होते