अवकाळी पाऊस आणि पाण्याची गळती या नुकसानीनंतर जिते गावाच्या शिवारात फुलली भाजीपाला शेती...

28 Apr 2022 12:23:08
vegitable farm
 
कर्जत | कर्जत तालुक्यातील उल्हास नदीच्या पाण्यावर जिते येथे मोठ्या प्रमाणात भाजीपाला शेती स्थानिक शेतकरी करीत असतात. मात्र अवकाळी पाऊस आणि त्यानंतर स्थानिक जमिनीतून जाणारी जलवाहिनी फुटल्यानंतर शेतीचे नुकसान नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात झाले होते.
 
vegitable farm
 
मात्र त्यातही सावरत स्थानिक शेतकर्‍यांनी भाजीपाला शेती हे रोजगाराचे प्रमुख साधन लक्षात घेऊन शिवारात भाजीपाल्याचे शेती फुलवली आहे.
 
vegitable farm
 
कर्जत तालुक्यातील नेरळ-कशेळे या भीमाशंकर राज्यमार्ग रस्त्यावर वाकस पुलाजवळ जिते गावाच्या शिवारात स्थानिक शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात शेती करीत असतात.
 
vegitable farm
 
त्या भागात साधारण १० एकर जमिनीवर पावसाळा संपला कि भाजीपाल्यातील विविध प्रकारचे शेती करीत असतात.कोरोना चा काळ मागील दोन वर्षे सुरु होता आणि त्यावेळी जैविक खाटांपासून निर्माण केलेल्या भाजीपाला याची खरेदी करण्यासाठी ग्राहक थेट शेतात पोहचत होते.
 
vegitable farm
 
नोव्हेंबर २०२१ मध्ये तेथे भाजीपालाचे मले फुलविणारे शरद जाधव आणि अंकुश जाधव केलेल्या १० एकर जमिनीतील भाजीपाल्याचे नुकसान नेरळ ग्रामपंचायतच्या जलवाहिनीच्यावर लावले. त्या जमिनीतून जाणारी जलवाहिनी फुटली आणि त्यामुळे सर्व भागातील पिके पाणी शेतात साचून राहिल्याने नुकसान झाले आणि अक्षरशः कुजली.
 
vegitable farm
 
या नुकसानी नंतर या शेतकर्‍यांनी पुन्हा एकदा भाजीपाला पीक घेण्यासाठी लागवड केली आणि पीक फुलावर आले असताना यावेळी पावसाने त्या पिकाचे नुकसान केले. मात्र आमची शेतकर्‍यांची जात... अस्मानी संकटाला घाबरत नाही हा किस्सा तंतोतंत खरा ठरवत पुन्हा एकदा नुकसान सोसून पुन्हा एकदा भाजीपाला शेतीकडे लक्ष केंद्रित केले.
 
vegitable farm
 
उल्हास नदीचे पाणी पंपाच्या साहाय्याने शेतात पाणी घेऊन मिरची, कोबी, फ्लॉवर, गवार, दुधी, कारली, घोसाळ, शिराळे, मका, गाजर, बीट अशा प्रकारची भाजीचे पीक घेण्यासाठी लागवड केली. तसेच शापू पालक, मेथी, कोथिंबीर, मूळा अशा पालेभाज्या आणि झेंडूची फुलशेती देखील केली आहे.
 
vegitable farm
 
रासायनिक खतांचा वापर केला जात नसल्याने शरद जाधव आणि अंकुश जाधव या शेतकर्‍यांनी शेतात पिकवलेला भाजीपाला अधिक लोकप्रिय झाला आहे.
 
जैविक पद्धतीने भाजीपाला खरेदी करण्यासाठी आता थेट जाधव यांच्या बांधावर जाऊ लागले आहे. दाम्पत्याने जवळच्या रस्त्यावर खरेदी करू लागले व्यातून शरद केली. जैन आपल्या विकत घेऊ लागले.
 
नेरळ येथून भीमाशंकर रस्त्याने जाणारे वाहक आपली वाहन थांबवून भाजीपाला विक्री करण्यासाठीची रांघ लागलेली असा त्यामुळे जाधव यांना शेतात पिकवलेला भाजीपाला अन्यत्र नेवून विकण्याची वेळ येत नाही. पिकाची माहिती सर्वांना होऊ लागली.
 
शरद जाधव आणि त्यांची पत्नी शारदा यांच्या मदतीने मागील आपल्या तीन वर्षापासून भाजीपाला शेतीकडे वापर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांचा दुग्ध केली व्यवसाय देखील सुरु असून शेतीतून पिकवलेली भाजी आपल्या शेतात ती भाजी खरेदी करण्यासाठी आनंदाने येतात आणि खरेदी करतात.
 
हा आनंद सर्वांच्या चेहेर्‍यावर दिसून येत असल्याने ग्राहकांचा ओढा वाढला आहे. स्वतः शारदा शरद जाधव या सकाळ-सायंकाळ भाजीपाला घेऊन रस्त्यावर बसतात. आणि त्यांची टोपली जमिनीवर उतरली कि ताजा करण्यासाठी झुंबड उडते.
 
त्यामुळे त्यांना नेरळच्या बाजारपेठेत किंवा बाजारपेठेत भाजीपाला विक्री करण्यासाठी जावे लागत नाही. सेंद्रिय खते वापरून कडधान्य व भाजीपाला शेती केली आहे,त्यातून आम्ही उदरनिर्वाह करतो असे मत शरद जाधव मांडतात.
Powered By Sangraha 9.0