श्रीवर्धनच्या पोलीस निरीक्षकपदी संजय पाटील

By Raigad Times    22-Apr-2022
Total Views |
Shrivardhan Police
 
श्रीवर्धन । श्रीवर्धन पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांची रोहा येथे बदली झाली असून त्यांच्या जागी संजय पंडित पाटील यांनी श्रीवर्धनचे नवीन पोलीस निरीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारला आहे.
 
रोहा येथे आठ महिने पोलीस निरीक्षक म्हणून सेवा करुन त्यांची बदली आता श्रीवर्धन येथे झाली आहे. त्यांचे मूळ गाव कोल्हापूर असून त्यांची यापूर्वीची सर्वाधिक सेवा मुंबई (17 वर्षे) व ठाणे (7 वर्षे) येथे झाली आहे.
 
श्रीवर्धन तालुका हा पर्यटन तालुका असल्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणावर श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर या ठिकाणी येत असतात. त्यांना कोणताही त्रास होऊ नये, जास्तीत जास्त सुख-सुविधा मिळाव्यात, यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे संजय पाटील यांनी सांगितले.