पेण: शिवसेनेचे किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन

12 Apr 2022 11:52:41
pen andolan
 
 
पेण | आयएनएस विक्रांत या नावाने अंदाजे ५७ कोटी रुपये गोळा करून घोटाळा करणार्‍या भाजपच्या किरीट सोमय्या विरोधात पेण तालुका शिवसेनेने जोडे मारो आंदोलन करीत त्यांच्या प्रतिमेला काळे फासले व जाहीर निषेध केला. त्याच प्रमाणे घोटाळेबाज किरीट सोमय्या वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
 
 
किरीट सोमय्या यांनीआयएनएस विक्रांतच्या नावाखाली अंदाजे ५७ कोटींचा निधी गोळा करून तो पैसा हडपला. हा निधी राज्यपालांकडे सुपूर्द करणे अपेक्षित होते मात्र, ही रक्कम तिथे जमा केली गेली नाही अशी माहिती माहिती अधिकारात प्राप्त झाली आहे.
 
 
या वेळी उपजिल्हा प्रमुख अविनाश म्हात्रे, विधानसभा प्रमुख बाळा म्हात्रे, तालुकाप्रमुख तुषार मानकवळे, शहर प्रमुख सुधाकर म्हात्रे, माजी शहर प्रमुख प्रदीप वर्तक, महिला आघाडीच्या दीपश्री पोटफोडे, महिला नेत्या कल्पना पाटील, राजश्री घरत, वाहतूक सेनेचे दिलीप पाटील, अच्युत पाटील, प्रशांत पाटील, नरेश सोनावणे, राजा पाटील, तुकाराम म्हात्रे, नरेश शिंदे, लवेंद्र मोकल, गजानन मोकल, संजय पानसे, प्रसाद देशमुख, राजाराम पाटील, युवा सेनेचे चेतन मोकल, धीरज पाटील, हर्षद पाटील, अशोक वर्तक, आशिष वर्तक, नंदू मोकल यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
 
 
यावेळी बोलताना तालुकाप्रमुख तुषार मानकवळे, उप जिल्हाप्रमुख अविनाश म्हात्रे, यांनी आपल्या भाषणातून किरीट सोमय्यायांचा निषेध व्यक्त करीत सांगितले कि, संपूर्ण भारतीय बनावटीची युद्धनौका आयएनएसविक्रांत कालबाह्य ठरल्यानंतर ती वाचण्यासाठी सोमय्या यांनी देशप्रेमाची हाक देऊन मोठ्या प्रमाणात निधी संकलित केला होता. यासाठी रेल्वे स्थानके, विमानतळां वरून रक्कम जमा केली. नागरिकांनीही देशप्रेमापोटी सढळ हस्ते मदत केली. आयएनएस विक्रांतवाचविण्याच्या मोहिमेत किती रक्कम जमा झाली, या रकमेचा विनियोग कसा करण्यात आला हे आज पर्यंत सोमय्या यांनी उघड केले नाही. ही रक्कम जमा करत असताना आयएनएस विक्रांतचे भव्य युद्धनौकेत रूपांतर करून सदर निधी राजभवनात जमा करणार असल्याचे त्यावेळी सांगितले होते. मात्र किरीट सोमय्या यांनी हा निधी राजभवनावर जमाच केला नाही. तसेच राजभवनावर कुठल्याही प्रकारचा धनादेश अथवा रक्कम जमा करण्यात आली नाही. म्हणून कोट्यावधींचा घोटाळा करणार्‍या किरीट सोमय्याचा निषेध शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0