चिमुकल्या जीवांसाठी आर्थिक मदतीचे आवाहन...

नाटकाच्या प्रयोगातून केली एक लाख 11 हजाराची मदत

By Raigad Times    08-Mar-2022
Total Views |
aarthik madat avhahan
 
कर्जत | स्वरांजली आणि स्वराली कदम या चौक गावातील लहान मुलींच्या शरीरातील अवयव बदलण्याची गरज डॉक्टरांनी सांगितली आहे. या दोघींवर बोन म्यारो ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया आवश्यक असून त्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, कर्जत येथील मदर आय फाउंडेशनने एका नाट्य प्रयोगाच्या खेळातून एक लाख 11 हजाराची आर्थिक मदत केली.

aarthik madat avhahan
 
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील चौक या गावातील अमित जाधव यांच्या दोन लहान मुली स्वरांजली आणि स्वराली यांना असलेल्या आजारामुळे त्यांचे अवयव बदलाची प्रक्रिया त्यांच्या पालकांना करावी लागणार आहे. बोन म्यारो ट्रान्सप्लांटच्या ऑपरेशनसाठी रुग्णालयानी 37 लाख रुपये खर्च सांगितला आहे. त्या दोन्ही मुलींच्या पालकांची आर्थिक स्थिती बेताची असल्याने दोन्ही मुलींवरील शस्त्रक्रिया करण्यासाठी मदतीचे आवाहन पालकांनी केले आहे. त्यानुसार त्या दोन्ही मुलींच्या शरीरातील अवयव बदलाच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत व्हावी यासाठी कर्जत शहरातील मदर आय फाउंडेशनने छुमंतर या विनोदी नाटकाचा प्रयोग आयोजिय केला होता.
 
aarthik madat avhahan
 
कर्जत शहरातील राॅयल गार्डन हाॅलमध्ये लावलेल्या त्या नाटकाच्या प्रयोगाचा खर्च वगळता उरलेली सर्व रक्कम चिमुकल्यांच्या शस्त्रक्रियेसाठी दिली जाणार असे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार त्या नाटकाच्या प्रयोगातून एक लाख 11 हजाराची आर्थिक मदत स्वरांजली आणि स्वराली जाधव यांना नाट्य प्रयोगानंतर देण्यात आली. तरी समाजाने उदारपणे या दोन्ही मुलींना जीवदान देण्यासाठी जमेल तेवढी मदत करण्याचे आवाहन केले जात आहे.