तरुणीवर बलात्कार प्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

07 Mar 2022 17:12:45
balatkar gunha dakhal
 
कर्जत | पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भिसेगाव येथील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करण्यात आला. वारंवार शारीरिक अत्याचार करून फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित तरुणावर कर्जत पोलिस ठाण्यात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
कर्जत पोलीस ठाणे हद्दीत दि. १मे २०२० ते २६ ऑक्टोबर २०२१ या दरम्यान कर्जत शहरातील मुद्रे येथील प्रथमेश हाऊस येथील तिघांनी संगनमत करून आरोपी एक याने कर्जत भिसेगाव येथील महिला फिर्यादी यांच्याशी कोणत्याही रितीरिवाजाप्रमाणे लग्न न करुन जे लग्न केले आहे ते कायदेशीर आहे असे भासवून लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादी यांच्या इच्छेविरुध्द शारीरिक संबंध ठेवले. प्रकरण अंगाशी येत असल्याचे पाहून जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडुन फिर्यादी यांना खोटया लग्नानंतर आरोपीने त्याच्या घरी नांदवायला घेऊन जातो असे सांगितले.
 
नंतर त्याने सोबत रहावयाचे नाही आणि घटस्फोट घे, मला सोबत राहावयाचे नाही असे बोलून फिर्यादी यांना हाथाबुक्याने मारहाण करुन शिवीगाळी करुन जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच असहायतेचा गैरफायदा घेऊन फिर्यादी यांचे शारीरीक आणि मानसिक शोषण केले. तसेच आरोपी क्रमांक दोन याने आरोपी एक बरोबर बलात्काराची शिकार झालेल्या तरुणीसोबत लग्न करुन देतो असे दिलेले आश्वासन पुर्ण केले नाही आणि मात्र संबंधित प्रकरणी सदर महिलेची बदनामी केली जात आहे.त्यामुळे त्या महिलेने आपल्या वरील अन्यायाबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गु.र.नं.४९/२०२२ भा.दं.वि.क. ३७६, ४२०, ३२३, ३१३ ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक अथने करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0