कोर्लई/राजीव नेवासेकर । मुरुड तालुक्यातील आगरदांडा-दिघी पोर्टमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्या; अन्यथा दिघी व आगरदांडा दोन्ही पोर्ट चालू देणार नाही, असा इशारा आमदार महेंद्र दळवी यांनी दिला आहे. तसेच पोर्टने स्थानिकांची फसवणूक केल्याची तक्रारदेखील करण्यात आली आहे.
पोर्ट प्रशासन स्थानिकांची देणी देण्यास टाळाटाळ करत असल्याचे निवेदन पोर्ट कमिटीने आ.महेंद्र दळवी यांना दिलेे होते. त्यामुळे आज आमदार महेंद्र दळवी यांनी शेकडो शिवसैनिकांसह आगरदांडा-दिघी पोर्टला धडक दिली. स्थानिकांची साडेपंधरा कोटींची देणी लवकरात लवकर द्यावीत. तसेच स्थानिकांवर होणारा अन्याय त्वरीत थांबवावा, स्थानिकांना प्रथम प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, दिघी-आगरदांडा पोर्ट कंपनीने केलेल्या फसवणुकीविरोधात आमदार महेंद्र दळवी यांनी मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.