तळा येथील फॉरेस्ट हिल येथील अपघातात एकाचा मृत्यू, तर एक गंभीर

23 Mar 2022 16:54:46
Accident
 
 विराज टिळक / तळा |  तळा येथील तारस्ते गावानजिक असलेल्या प्रसिद्ध फॉरेस्ट हिल येथे अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर असल्याची बातमी समोर आली आहे.
 
फॉरेस्ट हिल येथील कर्मचारी सर्फराज आलम याचा अपघातादरम्यान मृत्यू झालाय. फॉरेस्ट हिल येथील उतारात सर्फराज याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि तो एका लोखंडी कॅबिन ला जोरदार धडकला त्यात सर्फराज याचा मृत्यू झालाय तर त्याच दुचाकीवर असलेला विवेक हेगडे हा गंभीर जखमी असल्याच समजतंय.
 
अपघातानंतर या दोघांना तातडीने रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी सर्फराज याला मृत घोषित केले तर विवेक गंभीर जखमी असल्याने त्याला पुढील उपचारासाठी एमजीएम मुंबई येथे हलवण्यात आलाय.. या गुन्ह्यांची तळा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. अधिक तपास तळा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक जी. बी. ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली आर. के. सर्नेकर करीत आहेत
Powered By Sangraha 9.0