कशेडी घाटात चहा पिण्यास थांबलेल्या प्रवाशांना ऍस टेम्पोची धडक; एक ठार आणि तिघे जखमी

19 Mar 2022 11:31:43
accident 1
 
 
पोलादपूर । मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात शुक्रवारी पहाटे झालेल्या एका विचित्र अपघातात चहा पिण्यासाठी थांबलेल्या गोवा येथे जाणार्‍या प्रवाशांना संगमेश्वर येथून भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला तर अन्य तिघे जखमी झाले. पोलादपूर पोलीस ठाण्यात या अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
शुक्रवार, दि. 18मार्च 2022 रोजी पहाटे वाजताचे दरम्याने ऑरा कार क्रमांक एमएच 48बीटी 1817 या कार मधुन जयेश रमेश राऊत, वय 38 आणि अंजली जयेश राऊत (वय 32) दोन्ही राहणार विरार मुंबई यांचेसह चालक विनीत मधुकर राऊळ, (वय 37) तिघेही विरार मुंबई येथील राहणारे असून ते गोवा येथे जात असता कशेडी बंगला येथे गाडी थांबवून चालक विनीत राऊळ तसेच जयेश राऊत हे दोघे चहा पीत उभे होते. त्याचवेळी मोटार सायकल बजाज पल्सर क्रमांक एमएच 08 टी 3666 वरील अशोक तुळशीराम पांगले (वय 50) मुंबई (जखमी) आणि अशोक यशवंत राऊत (रा.कसबा ता. संगमेश्वर) हदेखील चहा पिण्याकरीता थांबले होते. त्याचवेळी मुंबई ते संगमेश्वर असा जाणारा टाटा एसी गोल्ड टेम्पो (एमएच 08 एटी 9211) चा चालक-महम्मद यासीन उमर फारुख पठाण 5 संगमेश्वर मापारी मोहल्ला हामोहम्मद हमाद उमर फारूक पठाण (वय-25,रा.संगमेश्वर मापारी मोहल्ला) याचेसह मुंबई ते संगमेश्वर असा चालवत घेऊन जात असता झोप अनावर झाल्याने गाडीवरील ताबा सुटून महामार्गालगत टपरीवर चहा पीत असलेल्या लोकांना ठोकर मारून अपघात केला.
 
 

accident 2 
 
 
अपघातात गंभीर जखमी विनीत मधुकर राऊळ (वय 37, रा.विरार) याला जास्त गंभीर दुखापत झाल्याने उपचाराकरता नरेंद्र महाराज ट्रस्टच्या ऍम्ब्युलन्सने पोलादपूरला ग्रामीण सरकारी रुग्णालय येथे दाखल केले असता उपचारादरम्यान तो मयत झाला. जखमींवर उपचार सुरू असून काहींना किरकोळ जखमा असल्याने उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे. अपघातस्थळी असलेली अपघातातील वाहने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली असून वाहतूक सुरळीत चालू करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलीस उपनिरिक्षक ए.पी.चांदणे यांनी दिली. याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये अपघाताची नोंद करण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दिलीप सारंगे अधिक तपास करीत आहेत. महाड डीवायएसपी आयपीएस निलेश तांबे यांनी घटनास्थळी भेट दिली.
Powered By Sangraha 9.0