म्हसळा मेंदडी येथे विवाहितेची गळफास लावून आत्महत्या

By Raigad Times    11-Mar-2022
Total Views |
vivahitechi aatmyahatya
 
म्हसळा । नवऱ्याजवळ पटत नाही म्हणुन तीन महिने वडिलांचे घरी माहेरी वास्तव्यास गेलेली असताना 24 वर्षाचे विवाहित महिला प्रणाली निलेश नाक्ती, रा खरसई हिने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याची घटना म्हसळा तालुक्यातील मेंदडी गणेशनगर येथे दिनांक 10 मार्च 2022 रोजी सायंकाळी 6 वाजताचे दरम्यान घडली.
 
घटनेची फिर्याद मयताचे वडील गोपाळ अर्जुन पाटील वय 45 वर्षे, रा.मेंदडी गणेशनगर यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात दिली असता पोलिसांनी आकस्मात मृत्यू रजी नंबर 03/22,सिआरपीसी 174 प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.
 
घटनेची म्हसळा पोलिसांनी अधिक माहिती दिली असता प्रणाली हिचे खरसई येथील निलेश नाक्ती याचे बरोबर समाज रीती रिवाजाप्रमाणे विवाह झाले होते. वेळोवेळी दोघांचे एकमेकांजवळ पटत नव्हते. मागील 3 महिन्यापासुन प्रणाली मेंदडी येथे तिच्या वडिलांचे घरी माहेरी राहायला गेली होती. दिनांक 10 रोजी प्रणाली हिने घरात कोणीही नसताना घराचे छताचे लाकडी भाळास ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.