पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांचा ‘युरोपियन इंटरनॅशनल इन्स्टीट्यूट’कडून सन्मान

25 Feb 2022 17:33:25
appasaheb dharmadhikari
 
सचिनदादा धर्माधिकारी यांना डॉक्टरेट पदवी बहाल
 
अलिबाग । अलिबाग । पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना युरोपियन इंटरनॅशनल इन्स्टीट्यूटकडून ‘लिव्हींग लिजेंड’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी सचिनदादा धर्माधिकारी यांना मानाची डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. सोबतच फेम टाईम इंटरनॅशनल ग्लोबल लिडरशीप अवार्डनेही त्यांना गौरवण्यात आले.
 
sachindada dharmadhikari
 
थायलंडमधील बँकॉक येथील रेनीसन्स येथे हा सोहळा आज (25 फेब्रुवारी) संपन्न झाला. यावेळी युनिव्हर्सीटीचे डायरेक्टर जनरल डॉ. एडव्हर्ड रॉय, डॉ. चांग यान लँग, टीना यँग, डॉ. रॉबर्ट ब्रँड, आणि डॉ. आर परमेश्वर, डॉ. अजय देसाई उपस्थित होते.
 
sachindada dharmadhikari
 
महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांनी सुरु केलेल्या श्री समर्थ दासबोधाच्या निरुपणाची अखंड परंपरा, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड सुरु आहे. त्यांच्या या कार्याबद्दल भारतातच नव्हे, तर परदेशातही गौरव केला जात आहे.
 
apaasaheb dharmadhikari 
 
ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीसह स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड, आरोग्य शिबीर, जलसंधारणाचे कार्य, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता आवश्यक असणारे प्रशिक्षण, तलाव-विहिर-धरण गाळ उपसा, ग्रामस्वच्छतेचे उपक्रम राबवत धर्माधिकारी प्रतिष्ठानने कार्य केले आहे.

sachindada dharmadhikari
 
याची दखल घेवून युरोपियन इंटरनॅशनल इन्स्टीट्यूटकडून डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘लिव्हींग लिजेंड’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर सचिनदादा धर्माधिकारी यांना मानाची डॉक्टरेट पदवी बहाल केली आहे.
Powered By Sangraha 9.0