अरे यार... देवाने दोन इंच आणखी उंची दिली असती तर मी पोलीस भरतीला पात्र झालो असतो किंवा झाले असते..मोठेपणी, कमी उंची ही अनेकांसाठी समस्या बनून राहते. पण तुम्हाला माहीत आहे का, उंच, छान सशक्त शरिरयष्टीची बीजे आपल्या लहानपणीन आहारातून रोवली जावू शकतात.
राज्य सरकारचे महिला व बाल विकास विभाग यासाठी कार्यरत असते. बालक सशक्त, निरोगी जन्माला यावा त्याची वाढ चांगली व्हावी, मातेने कोणते आहार घ्यायला हवे आहेत. या विभागाकडून गरोदर स्त्रियांनी नियमीत कोणती काळजी घ्यावी, काय उपायोजन करण्यात याबाबत मार्गदर्शन सुचना दिल्या जातात.
गरोदर मातेने दररोज आयरन आणि व्हिटामिन युक्त विविध पौष्टीक आहार घ्यावा असे सांगितले जाते. पौष्टीक असलेले दुध, आयोडीन युक्त मिठ खावे. आई.एफ.ए ची लाल गोळी चौथ्या महिन्यापासून ते 180 दिवसांपर्यंत दररोज खावी, कॅलशियमची ठरावी मात्रा घ्या, एक एल्बेण्डाजोलची गोळी दुसर्या तिमाहीत घ्या, याशिवाय आहारामध्ये दुध, तुप, लोणी, अंडी, मासे, हिरव्या पालेभाज्या, विविध प्रकारची कडधान्य,फळे, शेंगदाना, गुुळ-लाडू, राजगीर लाडू असे आहार गरोदर मातेने घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
याशिवाय बाळाच्या जन्मानंतरही अनेक उपाय योजन आणि आहाराची काळजी या विभागाकडून सुचवली जाते. त्यामुळे बाळ निरोगी राहतो. त्याची वाढ चांगली होते असा सल्ला डॉक्टर देत असतात. दोन वर्षापर्यंत बालकाची उंची किती असली पाहीजे? बुटकेपणा / खुजेपण कसा मोजायचा ते खाली आम्ही देत आहोत.
बुटकेपणा / खुजेपण कसा मोजायचा पहा खाली तक्ता दिलेला आहे.
बुटकेपणा / खुजेपण कसा मोजायचा पहा खाली तक्ता दिलेला आहे.