डिफेन्स अकॅडमी, अलिबाग शाखेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

By Raigad Times    30-Nov-2022
Total Views |
plantation
 
 
अलिबाग : डिफेन्स अकॅडमी अलिबाग शाखेला एक वर्ष पूर्ण झाले यानिमित्त अकॅडमी च्या सदस्यांकडून वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जोपसण्यात आली.
 
सदर उपक्रमा मध्ये डिफेन्स अकॅडमी चे संस्थापक सनी शेलार, समरेश शेळके, अनिकेत म्हामुणकर आणि अकॅडमी चे सदस्य अक्षय पाटील, स्वप्नाली म्हामुणकर, अमिषा भगत यांनी वृक्षारोपण केले.
 
तसेच अकॅडमी च्या विद्यार्थ्यांना सुद्धा समाज कार्याची आणि निसर्गाबद्दल आपल्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी विद्यार्थ्यांना देखील रोपांच वाटप करून वृक्षरोपण करण्यास सांगितलं.