राजकीय गैसमजातुन कर्जत येथील चार तरुणांना मारहाण

By Raigad Times    25-Nov-2022
Total Views |
beaten
कर्जत : राजकीय गैसमजातुन कर्जत येथील रिलायन्स पेट्रोल पंप येथे तांबस येथील चार तरुणांना मध्यरात्री मारहाण करण्यात आली. त्यावेळी एका व्यक्तीकडून लोखंडी हत्यार देखील वापरण्यात आले असून या हल्ल्यात तीन तरुण जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेत रायगड जिल्ह्यातील मोठ्या राजकीय नेत्यावर तसेच अन्य एक आणि २५ अनोळखी यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे.
कर्जत पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 22/11/2022 रोजी मध्यरात्री 01:30 वा.सुमारास तालुक्यातील तांबस येथील सुशील देवराम जाधव हे आपल्या मित्रांसह आले असता त्यांच्यावर २५ हुन अधिक तरुणांच्या जमावाने हल्ला करण्याची घटना घडली आहे.त्या घटनेत पनवेल येथील मोठया राजकीय व्यक्तीकडून तसेच त्याचे सोबत 20 ते 25 अनोळखी व्यक्ती यांनी एकत्र जमून गैरकायदयाची मंडळी एकञीत सुशील जाधव तसेच अन्य तिघे यांना थांबवुन विनाकारण शिवीगाळी केली आणि नंतर हाताबुक्याने मारहाण केली आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
तर गुन्ह्यआतील दुसरा आरोप याने सुशील जाधव तसेच हरेश रमेश गायकवाड,निलेश गायकवाड यांच्यावर लोखंडी हत्यार वापरून हल्ला चढवला. त्यात सुशील जाधव यांच्या उजव्या गालावर,डोक्याचे डाव्या बाजुला मारहाण केली. तर हरेश गायकवाड यांच्या यांच्या उजव्या डोळयाजवळ, हनुवटीच्या उजव्या बाजुस मारहाण केली आणि तसेच साक्षीदार निलेश गायकवाड यांच्या डोक्याचे डाव्या बाजुला मारहाण करुन दुखापत केली. सादर घटनेत सुशील जाधव यांची सोन्याची साखळी तसेच अंगठी हरवली असून हरेश गायकवाड यांची सोन्याची साखळी तुटली आहे.
या हल्ल्याची नोंद कर्जत पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 360/2022 नुसार झाली असून पोलीस निरखसक के डी कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु असून भा.दं.वि.कलम 324,323,327,143,147,149,504,506 प्रमाणे गुन्हा दाखलझाला आहे.