श्रीवर्धन : राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचा शिवसेनेच्या वतीने निषेध

By Raigad Times    22-Nov-2022
Total Views |
protest
 
 
श्रीवर्धन : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एका जाहीर कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले असून सर्वत्र त्यांचा जाहीर निषेध व त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
 
या संदर्भात श्रीवर्धन येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेनेतर्फे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा जाहीर निषेध करण्यात आला निषेध करताना राज्यपालांच्या प्रतिमेला जोडे मारो अंदोलन करण्यात आले असून राज्यपाल यांच्यावर राज्य सरकार व केंद्र सरकारने कारवाई कारवाई झाली झाली पाहीजे अन्यथा अधिक त्रिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी शिवसैनिकांच्या वतीने देण्यात आला .यावेळी राज्यपाल कोशारी यांचा निषेध करताना तालुक्यातील शिवसैनिक पदाधिकारी व महीला आघाडी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
 
यावेळी शहर मतदारसंघ उपसंघटक अरूण शिगवण, तालुका प्रमुख अविनाष कोळंबेकर उप तालुकाप्रमुख सचिन गुरव, उप ता प्रमुख जुनेद दुस्ते, तालुका संघटक गजानन कदम, शहर प्रमुख राजु चव्हाण, शिवराज चाफेकर, महिला संघटिका रानी बोरकर महिला तालुका संघटिका विभाग प्रमुख संदिप रिकामे, सागर जाधव आदी उपस्थित होते.