विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची अलिबाग येथे विवाह सोहळा निमित्ताने उपस्थिती

By Raigad Times    22-Nov-2022
Total Views |
assembly speaker
 
सोगाव : रायगड जिल्ह्यातील शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते व अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील मापगांव ग्रामपंचायत सदस्य विजय भगत यांचा मुलगा वेदांत याच्या विवाह सोहळानिमित्ताने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आवर्जुन उपस्थित होते.यावेळी विजय भगत यांनी राहुल नार्वेकर यांचे स्वागत करत शाल व श्रीफळ देत सत्कार केला.तसेच अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वधूवरांना आशीर्वाद देत शुभेच्छा दिल्या.
 
यावेळी मापगांव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य वस्सीम कुर,शेकाप कार्यकर्ते मज्जीद कुर,जगदीश सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.