अंतराराष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये रायगडच्या स्पर्धाकांचे वर्चस्व

20 Nov 2022 12:54:32
sports
उरण : नेपाळ येथे झालेल्या "संयुक्त भारत खेल फाउंडेशन"च्या सातव्या आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धामध्ये जलतरण विभागामध्ये जिल्ह्यातील सात स्पर्धकांनी सहभागी होत, 13 सुवर्ण आणि 1 रजत पदकांची कमाई केली आहे. देशाचे प्रतिनिधित्व करत अत्यंत चूरशिच्या झालेल्या स्पर्धेमध्ये या साताही स्पर्धकांनी आपला ठसा उमटवत जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे. या यशाबद्दल स्पर्धाकावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
 
 
संयुक्त भारत खेल फाउंडेशन यांच्यावातीने इंदोर, मध्यप्रदेश येथे घेण्यात आलेल्या सातव्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आर्यन विरेश मोडखरकर, हितेश भोईर आणि जयदीप सिंग या तीन स्पर्धकांनी प्रत्येकी तीन सुवर्ण पदकांची कमाई केली होती. तर तिघांनी यावेळी एकूण नऊ सुवर्ण पदकांची लूट केली होती.

sports 1 
 
 
या स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धाँसाठी या तीनही जलतरणपटुंची निवड झाली होती. 19 नोव्हेंबर येथे झालेल्या "संयुक्त भारत खेल फाउंडेशच्या"सातव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धाँमध्ये जलतरण विभागातील स्पर्धेमध्ये आर्यन विरेश मोडखरकर याने 17 वयोगटामधील 50 मी. बटरफ्लाय आणि 100 मी. फ्रिस्टाईल या प्रकारात स्पर्धा करत दोनही स्पर्धाँमध्ये सुवर्ण पदकांची कामाई केली आहे. तर हितेश भोईर याने 30 वयोगटामधील 50 मी. फ्रिस्टाईल आणि 200 मी. आयएम या प्रकारामध्ये सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.
 
जयदीप सिंग यानेही 50 मी. ब्रेस्ट स्ट्रोक आणि 100 मी. ब्रेस्टस्ट्रोक या प्रकारामधील सुवर्ण पदकांवर आपले नाव कोरले आहे. तर सचिन उल्हास शिंगरुत दोन सुवर्ण पदके, संकेत म्हात्रे दोन सुवर्ण पदके, समर्थ नाईक एक सुवर्ण एक रजत, तर सनी टाक याने दोन सुवर्ण पदके मिळवून देशासाठी 13 सुवर्ण आणि 1 रजत पदाकांची कमाई केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तवरील या स्पर्धाँमध्ये सहभागी होत, रायगड जिल्ह्यातील या सात खेळाडून्नी केलेल्या कामगिरीची सर्वच स्तरातून वाहवाह केली जातं आहे.
Powered By Sangraha 9.0