सुहित जीवन ट्रस्टच्या अध्यक्षा डॉ.सुरेखा पाटील यांना महासंस्कृती कोकण सन्मान पुरस्कार प्रदान

By Raigad Times    14-Nov-2022
Total Views |
dr. surekha patil
 
पेण : पेण येथील गतिमंद मुलांची शाळा म्हणून ओळख असलेल्या सुहित जीवन ट्रस्टच्या अध्यक्षा डॉ.सुरेखा पाटील यांना महासंस्कृती व्हेंचर्स आयोजित महासंस्कृती कोकण सन्मान 2022 या पुरस्काराने मुंबई येथे सन्मानित करण्यात आले.
गुरुवार 10 नोव्हेंबर 2022 रोजी शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग महाराष्ट्र राज्य मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पॉईंट, मुंबई येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्कार प्रदान कार्यक्रम प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी आपले विचार मांडताना डॉ.पाटील यांनी सांगितले की, आपण विविध प्रयत्नांतून व अत्यंत खडतर प्रवासातून सदर गतिमंद मुलांची शाळा चालवीत असून शेवट पर्यंत सदर सेवा करत राहणार असल्याचे जाहीर केले.
सुहित जीवन ट्रस्टच्या अध्यक्षा डॉ.सुरेखा पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर पेण तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.