कर्जत तालुक्यात लंम्पि चर्म आजाराचे सहा बळी...

अजूनही तालुक्यात १७ जनावरे लंम्पि ग्रस्त

By Raigad Times    07-Oct-2022
Total Views |
lampi-karjat 
 
कर्जत|  गोचीड आणि डास यांच्यापासून गोवंशीय जनावरे यांना संसर्ग झालेला लंम्पि  जनावरांच्या चामडीवर होणार्‍या आजाराने कर्जत तालुक्यात तब्बल सहा जनावरे दगावली आहेत.तर तालुक्यात आजही १७ गोवंशीय जनावरे लंम्पिग्रस्त आहेत.दरम्यान,पशुधन विभागाने त्या मृत जनावरांचे पशुपालक यांना आर्थिक मदत जाहिर केली आहे.
 
कर्जत तालुक्यात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून आतापर्यंत सहा जनावरांचे बळी या रोगाने घेतले असून ४६ जनावरांना लागण झाली होती. कर्जत तालुक्यातील आतापर्यंत पिंपळोली गावात चार जनावर मृत पावली असून एक खांडस तर कळंब येथे मृत झाले आहे. कर्जत तालुक्यात आतापर्यंत खांडस, पिंपळोली, कळंब, वावे, बेडीसगाव, आंबिवली, कोल्हारे, तळवडे, बोरगाव, साळोख तर्फे वरेडी, जिते आणि आंत्ररट या गावातील ४६ गोवंशीय जनावरे यांना लंम्पि आजराची लागण झाली होती. त्यातील २९ जनावरे पूर्ण बारी झालेली आहेत. कर्जत तालुक्यातील सर्व गावांतील गायवर्गीय जनावरांचे लसीकरण हे जवळपास १००% पूर्ण झालेले आहे.
 
लसीकरणाच्या दिवशी, चरायला सोडल्याने किंवा इतर काही कारणाने आपली गायवर्गीय जनावरे ही लंपी चर्म रोग प्रतिबंधक लसीकरण पासुन वंचित राहिली आल्यास, पशुपालकांनी तात्काळ आपल्या नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यास संपर्क साधावा व आपल्या गायवर्गीय जनावरांचे लसीकरण पूर्ण करून घ्यावे. आवश्यक लसमात्रा या देखील उपलब्ध आहेत.
lampi-karjat2 
 
सर्व मृत जनावरे यांची माहित पशुधन विभागाने तात्काळ शासनाला कळविली होती. त्यानंतर शासनाने देखील लंम्पि मुळे दगावलेल्या गोवंशीय जनावरे यांचे पशु पालक यांना मदत करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मृत जनावरे यांचे पशुपालक यांच्या सहा जनावरे यांच्या मृत्यू बद्दल ८७ हजार रुपये यांची मदत जाहीर झाली आहे. त्या मदतीचे वाटप कर्जत तालुका स्तरावर करण्यात येत असल्याचे माहिती रायगड जिल्हा पशुधन अधिकारी डॉ शाम कदम यांनी दिली आहे. मात्र हि मदत तुटपुंजी असल्याची ओरड सर्व शेतकरी यांच्याकडून केली जात आहे. तालुक्यातील सर्व सहा पशुपालक यांच्या कडून मृत जनावरे हि किमान २५ हजार रुपये किमतीची एकज अशी होती आणि सर्व सहा जनावरे यांच्या मृत्यूची किमंत ८७ हजार दिली गेली आहे. ती रक्कम अत्यल्प असल्याबद्दल नाराजी पिंपळोली येथील शेतकरी मोरू काळन यांनी दिली आहे.
  • पशुपालकांनी बाधित गावातून, आपल्या गावात जनावरे आणू नयेत किंवा आपल्या गावातून इतर गावात किंवा तालुक्यांत जनावरांची वाहतूक/ने- आण करणे हे कटाक्ष्याने टाळावे. जेणे करुन आपल्या गावात सदर रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही व संभ्याव्य पशुधनाची हानी ही टाळता येईल. - डॉ मिलिंद जाधव